सोलर रुफ़ टॉपच्या नावे होणारी फसवणूक टाळा 

नागपूर :- सबसीडीसह कमी किंमतीत सोलर रुफ़ टॉप लावून देण्याचा बनाव करीत फ़सवणुक केल्याच्या काही घटना घडत असून, योग्य शहानिशा केल्याशिवाय ग्राहकांनी अशा फ़सवणुकीपासून सावध राहायचे आवाहन महावितरणतर्फ़े करण्यात आले आहे.

सोलर रुफ़ टोप योजनेत सहभागी होण्यास इच्छूक ग्राहकांनी सर्वप्रथम https://solarrooftop.gov.in/ या वेबसाईटवर जाऊन आपल्या तपशीलासह नाव नोंदणी केल्यानंतरच महावितरण कागदपत्रे तपासून नियमानुसार अर्ज मंजूर करेल. त्यानंतर, ग्राहकाने यादीतील सेवा पुरवठादार (व्हेंडर) निवडून त्याच्यासोबत करार करावा. यादित नसलेल्या कुठल्याही सेवा पुरवठादारासोबत करार करु नये किंवा त्यांच्यासोबत कुठलाही आर्थिक व्यवहार करु नये. या नोंदणिकृत पुरवठादाराने रूफ टॉप सोलर सिस्टिम बसविल्यानंतर महावितरण ती तपासेल व कार्यान्वित करेल आणि त्यानंतर रूफ टॉप सोलर सिस्टिमचा वापर सुरू झाला की, वीजनिर्मिती सुरू होईल व त्यानुसार बिलात सवलत मिळणार असल्याने या योजनेत सहभागी होण्यास इच्छूक ग्राहकांनी केवळ वेबसाईतवरील यादीतील नोंदणिकृत सेवा पुरवठादार (व्हेंडर) व्यतिरीक्त इतर कुणाही सोबत आर्थिक व्यवहार टाळून आपली फ़सवणूक टाळण्याचे आवाहन महावितरणतर्फ़े करण्यात आले आहे.

वीज ग्राहकांच्या फ़ायद्यासोबतच पर्यावरण पुरक असलेल्या या सोलर रुफ़ टॉप योजनेत सहभागी होत अधिकाधिक नागपूरकर वीज ग्राहकांनी नोंदणीकृत सेवा पुरवठादार (व्हेंडर) च्या माध्यमातून घराच्या छतावर सोलर रुफ टॉप बसविण्याचे आवाहन महावितरणतर्फ़े करण्यात आले आहे.

NewsToday24x7

Next Post

अँडव्हान्टेज विदर्भ प्रदर्शनातील महावितरणच्या दालनाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट

Tue Jan 30 , 2024
नागपूर :- खासदार औद्योगिक महोत्सवाचा एक भाग म्हणून नागपुरात आयोजित तीन दिवसीय अॅडव्हान्टेज विदर्भ प्रदर्शन आणि आयोजन नुकतेच करण्यात आले. व्यापार, वाणिज्य आणि गुंतवणुकीशी संबंधित विषयांचा ऊहापोह करणाऱ्या या प्रदर्शनात महावितरणतर्फ़े लावण्यात आलेल्या दालनाला नागरिकांचा उत्सफ़ुर्त प्रतिसाद मिळाला राज्याचे उपमुख्यमंत्री आणि ऊर्जामंत्री देवेंद्र फ़डणवीस यांनी देखील महावितरणच्या दालनाला भेट देत, तेथे उपस्थित अभियंत्यांसमवेत चर्चा केली. या प्रदर्शनात महावितरणतर्फे मुख्यमंत्री सौर […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com