अँडव्हान्टेज विदर्भ प्रदर्शनातील महावितरणच्या दालनाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट

नागपूर :- खासदार औद्योगिक महोत्सवाचा एक भाग म्हणून नागपुरात आयोजित तीन दिवसीय अॅडव्हान्टेज विदर्भ प्रदर्शन आणि आयोजन नुकतेच करण्यात आले. व्यापार, वाणिज्य आणि गुंतवणुकीशी संबंधित विषयांचा ऊहापोह करणाऱ्या या प्रदर्शनात महावितरणतर्फ़े लावण्यात आलेल्या दालनाला नागरिकांचा उत्सफ़ुर्त प्रतिसाद मिळाला राज्याचे उपमुख्यमंत्री आणि ऊर्जामंत्री देवेंद्र फ़डणवीस यांनी देखील महावितरणच्या दालनाला भेट देत, तेथे उपस्थित अभियंत्यांसमवेत चर्चा केली.

या प्रदर्शनात महावितरणतर्फे मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0, छतावरील सौर ऊर्जा निर्मिती आणि औद्योगिक ग्राहकांसाथी नव्यनेच सुरु करण्यात आलेल्या स्वागत कक्षाची विस्तृत माहिती छापील आणि दृकश्राव्य माध्यमातून नागरिकांना उपलब्ध करुन देण्यात आली. नागरिकांनी महावितरणच्या या दालनाला उत्सफ़ुर्त्पणे भेट देत विविध योजनांची माहिती घेत अनेक शंकांचे समाधान करुन घेतले. महावितरणच्या नागपूर परिक्षेत्राचे प्रादेशिक संचालक सुहास रंगारी, नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता दिलीप दोडके, अधीक्षक अभियंता अमित परांजपे आणि राजेश नाईक, कार्यकारी अभियंता हेमराज ढोके, राजेश घाटोळे, प्रतिक्षा शंभरकर यांच्यासह महावितरणच्या कॉग्रेसनगर, महाल, सिव्हील लाईन्स आणि गांधीबाग विभागातील अभियंत्यांनी प्रत्यक्ष संवाद साधून नागरिकांच्या विविध शंकांचे समाधान केले सोबतच महावितरणच्या विविध योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन देखील केले. या प्रदर्शनात महावितरणात सहभागासाठी विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशन तर्फे महावितरणला स्मृतीचिन्ह देवून गौरविण्यात आले.

NewsToday24x7

Next Post

वाचन संस्कृती जोपासणे गरजेचे - जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर

Tue Jan 30 , 2024
– ग्रंथोत्सव लेझीम, ढोलताशांच्या गजराने भंडारा शहर दुमदुमले भंडारा :- आज स्पर्धेच्या युगात टिकाव धरण्यासाठी सदैव अविरत वाचन करावे. वाचन केल्यास विचारांची खोली वाढविता येते. वाचनाकरिता वेळ काढण्यासाठी युवती करावे. कारण आयुष्यातील दिशा ठरविण्यासाठी विद्यार्थी-विद्यार्थींनींनी बाल वयापासूनच विविध प्रकारच्या पुस्तकांबरोबर वर्तमान पत्र वाचावे. व स्पर्धा परीक्षेत भाग घेऊन भारताचे सुजाण नागरिक बनावे. म्हणून वाचन संस्कृती जोपासणे गरजेचे आहे असे प्रतिपादन […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com