घरातील यमदुतांना वेळीच आवरा; कुलरचा वापर सावधगिरीने करा

नागपूर :- रविवार (दि. 9) रोजी काटोल तालुक्यातील वाढोणा येथे मावशीकडे गंगापूजनासाठी आलेल्या 7 वर्षीय शिवम मोहरिया या चिमूकल्याचा हात कुलरला लागल्याने विजेचा धक्का बसून दुर्दैवी मृत्य झाला तर शुक्रवारी (दि. 7) नागपूर शहरातील इमामवडा येथील 7 वर्षीय रुतवा बगडे या चिमुकल्याचा घरातील कुलर सुरु करताना विजेचा धक्का बसून दुर्दैवी मृत्य झाला. याशिवाय 30 एप्रिल रोजी बारा सिग्नल जवळील बोरकर नगर येथील 6 वर्षीय आकांक्षा संदेले या चिमुकलीचा खेळतांना कुलरला हात लागल्याने मृत्यू झाला. घरातील या यमदुतरुपी कुलरमुळे राज्यात दरवर्षी मोठ्या प्रमाणात जिवीत व वित्तहानी होत असते, अश्या अप्रिय घटना टाळण्यासाठी कुलर हाताळतांना सुरक्षिततेच्या उपाययोजना करण्याचे आवाहन महावितरणतर्फे करण्यात येत आहे.

कधी कुलरजवळ खेळतांना वीजेचा धक्का बसल्याने तर कधी टुल्लू पंप सुरू करतेवेळी विजेचा शॉक लागल्याने दुदैवी मॄत्यू झाल्याच्या घटना सातत्त्याने घडत असतात, या अप्रिय घटना टाळण्यासाठी ग्राहकांनी कुलरचा वापर सदैव थ्री पीन प्लगवरच करावा. घरात अर्थ लीकेज सर्कीट ब्रेकर्स बसवून घ्यावे, बाजारात हे उपकरण सहजरित्या उपलब्ध असून वीजेचा धक्का बसताच या उपकरणामुळे वीज प्रवाह खंडीत होऊन पुढिल अनर्थ टाळता येतो, घरातील अर्थिंग योग्य असल्याची तपासणी करून घ्यावी.

कुलरच्या लोखंडी बाह्यभागात वीज पुरवठा येऊ नये याकरिता कुलरचा थेट जमीनी सोबत संपर्क येर्इल अशी व्यवस्था करावी जेणेकरून कुलरच्या लोखंडी बाहयभागात वीज प्रवाहीत झाल्यास त्याचा धक्का लागणार नाही. कुलरमध्ये पाणी भरतेवेळी आधी कुलरचा वीज प्रवाह बंद करून प्लग काढावा व त्यानंतरच त्यात पाणी भरावे, कुलरच्या आतील वीज तार पाण्यात बूडली नसल्याची खात्री करून घ्यावी, कुलरमधील पाणी खाली जमिनीवर सांडणार नाही याची काळजी घ्यावी, ओल्या हाताने कुलरला स्पर्श करू नये, कुलरची वायर सदैव तपासूण बघा. फ़ायबर बाहयभाग असलेल्या व चांगल्या प्रतीच्या कुलरचा वापर प्राधान्याने करा. घरातील मुले व इतर सदस्य कुलरच्या सानिध्यात येणार नाही याची खबरदारी घेऊनच कुलर ठेवण्यात यावा. कुलरमधील पाण्याचा पंप 5 मिनीट सुरू व 10 मिनिट बंद ठेवणा­या इलेक्ट्रीकल सर्कीटचा वापर करा यामुळे वीजेचीही मोठया प्रमाणात बचत शक्य आहे.

ओल्या हाताने किंवा ओल्या जमिनीवर इभे राहून टुल्लू पंप सुरू करू नये, पंपातून पाणी येत नसेल तर पंपाचा वीज पुरवठा आधी बंद करून त्याचा प्लग काढल्यानंतरच पंपाला हात लावावा, पंप पाण्यात बुडला नसल्याची खात्री करून घ्यावी तसेच पंपाला वीज पुरवठा करणारी वायर पाण्यात बुडली नसावी, पंपाचे अर्थिंग योग्य असल्याचे तपासून घ्यावे, पंपातून नळ वाहिनीत वीज प्रवाहीत होणार नसल्याची काळजी घ्यावी, बरेचदा पाण्याची पातळी खोल गेल्याने पंप सुरू करूनही पाणी खेचल्या जात नाही व तो पंप एअर लॉक होतो अश्यावेळी प्रायमिंग करणे आवश्यक असते, बरेचदा अपु-या ज्ञानामुळे चालू पंपाचे प्रायमिंग केल्या जाते अश्यावेळी वीजेचा धक्का बसण्याची शक्यता असते त्यामुळे चालू पंपाचे प्रायमिंग करणे टाळावे असे आवाहनही महावितरणतर्फे करण्यात आले आहे.

आपल्या दैनंदिन व्यस्ततेतून थोडासा वेळ आपण या उपाययोजनांकरिता दिला तर कुलरमुळे होणारे वीजेचे अपघात मोठया प्रमाणात टळू शकतात, त्यामुळे आजच या उपाययोजनांची अंमलबजावणी करीत अप्रिय घटना टाळण्याचे आवाहन महावितरणतर्फे करण्यात येत आहे.

@ फाईल फोटो
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

संतोष जैन पेंढारी बघेरवाल रत्न पुरस्कार से सम्मानित

Tue Jun 11 , 2024
नागपुर :- श्री अखिल भारतवर्षीय दिगंबर जैन बघेरवाल संघ (दक्षिण प्रांत) और श्री बघेरवाल समाज सहायता ट्रस्ट (महाराष्ट्र) का त्रिवार्षिक अधिवेशन श्री दिगंबर जैन अतिशय क्षेत्र नेमगिरी जिंतुर जिला परभणी में रविवार को संपन्न हुआ। इस अधिवेशन में भारतवर्षीय दिगंबर जैन तीर्थक्षेत्र कमेटी के राष्ट्रीय महामंत्री नागपुर के समाजसेवी संतोष जैन पेंढारी को समाज का अत्युच्च पुरस्कार ‘बघेरवाल रत्न’ पुरस्कार […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com