छत्रपती संभाजीनगर विभागातील प्रलंबित पाणीपुरवठा योजना मिशन मोडवर पूर्ण कराव्या – पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील

मुंबई :- छत्रपती संभाजीनगर विभागातील महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि जिल्हा परिषद कडील पाणीपुरवठा योजनांची प्रलंबित कामे मिशन मोडवर पूर्ण करण्याचे निर्देश पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले.

छत्रपती संभाजीनगर विभागातील पाणीपुरवठा योजनांच्या कामाबाबतीत आढावा बैठक पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झाली. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव अभिषेक कृष्णा, जलजीवन मिशनचे संचालक अमित सैनी, मुख्य अभियंता मनीषा पलांडे, अधिक्षक अभियंता अजय सिंह, जलजीवन मिशन आणि जिल्हा परिषदेचे आठ जिल्ह्यातील अधिकारी उपस्थित होते.

मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले, छत्रपती संभाजीनगर विभागातील सर्व जिल्ह्यातील ज्या पाणीपुरवठा योजनाची कामे बंद पडली आहेत, त्याचा आढावा घेऊन ती कामे पुन्हा तात्काळ सुरू करावीत. ज्या कामाचे कार्यादेश दिले आहेत ती कामे पूर्ण होईपर्यंत त्यांचे संपूर्ण संनियंत्रण करावे. तसेच जे ठेकेदार कामे पुर्ण करणार नाहीत त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

घरगुती नळजोडणीची कामे दर्जेदार व्हावी, याकडे अधिकाऱ्यांनी विशेष लक्ष द्यावे. ‘हर घर जल’ योजनाची कामे पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावे. ‘हर घर जल’ झालेल्या गावांनी एक्स, इंस्टाग्राम व फेसबुक या समाज माध्यमाद्वारे प्रसिद्धी द्यावी. छत्रपती संभाजीनगर विभागातील पाणी पुरवठा योजनाना निधीची कमतरता नाही, त्यामुळे कामे जलदगतीने व दर्जेदार करण्याच्या सूचनाही पाटील यांनी यावेळी दिल्या.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

गावाच्या स्वच्छतेसाठी नागरिकांचा सहभाग उत्साहवर्धक - पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील

Thu Sep 28 , 2023
– स्वच्छता संवाद कार्यक्रमास सुमारे 2,53,162 नागरिकांचा सहभाग मुंबई :- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून स्वच्छ भारत अभियान टप्पा-2 अंतर्गत राज्यासह संपूर्ण भारत देश स्वच्छ करावयाचा आहे. त्या अनुषंगाने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त राज्यात “स्वच्छता ही सेवा” या अभियानांतर्गत “कचरामुक्त भारत” हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. यामध्ये नागरिकांचा सहभाग उत्साहवर्धक असल्याचे, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com