वीरांगना रानी अंवतीबाई लोधी बलिदान दिवसी स्मरण 

कन्हान : –  क्षत्रिय लोधी समाज कन्हान आणि महाराणी वीरागंना अंवतीबाई लोधी राष्ट्रीय प्रचार समिती व्दारे महाराणी वीरागंना अंवतीबाई लोधी यांच्या बलि दान दिवसी अभिवादन करून त्यांचे स्मरण करण्यात आले.
         इसवी सन १८५७ स्वातंत्र्य सग्रामाच्या प्रणेता मध्य भारतातील रामगढ च्या महाराणी वीरागंना अंवतीबाई लोधी हया शत्रुशी लढता लढता (दि.२०) मार्च ला त्याना वीरगती प्राप्त झाली होती.  तो दिवस बलिदान दिवस म्हणुन दरवर्षी साजरा करण्यात येतो. त्याच अनुंगाने रविवार (दि.२०) मार्च २०२२ ला जि प शाळा पिपरी समोर क्षत्रिय लोधी समाज आणि महा राणी वीरागंना अंवतीबाई लोधी राष्ट्रीय प्रचार समिती व्दारे महाराणी वीरागंना अंवतीबाई लोधी यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करित स्मरण करण्यात आले. याप्रसंगी समिती अध्यक्ष श्रवण वतेकर, मुलचंद शिंदेकर, लोकेश दमाहे, किरण ठाकुर, मोहीत वतेकर, पवन टिकम, बाला खंगार, रोहन पटेल, महावीर पटेल, नरेंद्र सोलंकी सह समाज बांधव उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

तीन गुन्ह्यांचा अल्पावधीतच छडा

Tue Mar 22 , 2022
– उत्कृष्ट कामगिरीसाठी पोलिसांचा गौरव – अपर पोलिस महासंचालकांच्या हस्ते बक्षीस नागपूर – लोहमार्ग पोलिसांनी कुठल्याही प्रकारचा धागा नसताना अतिशय अल्पावधीत गुन्ह्याचा छडा लावला. तसेच संपूर्ण मुद्देमाल जप्त केला. या विशेष आणि उत्कृष्ट कामगिरीसाठी अपर पोलिस महासंचालक डॉ. प्रज्ञा सरवदे यांच्या हस्ते स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांचा गौरव करण्यात आला. मुंबई येथील अपर पोलिस महासंचालक कार्यालयाच्या सभागृहात रोख, स्मृती चिन्ह आणि […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com