इंजिनियरिंग द्वितीय वर्षाच्या विद्यार्थिनीची गळफास लावून आत्महत्या

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या कल्पतरू कॉलोनी रहिवासी व इंजिनियरिंग द्वितिय वर्षाचे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थिनीने आपल्या राहत्या घरात पंख्याला ओळणीने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना गतरात्री घडली असून मृतक तरुणीचे नाव गोरिका विनोद नायर वय 17 वर्षे रा कल्पतरू कॉलोनी कामठी असे आहे. आत्महत्येचे कारण कळू शकले नाही मात्र या आत्महत्येचे घटनेने नायर कुटुंबासह परिसरात शोककळा पसरली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदर मृतक तरुणी ही कुटुंबातील लाडकी असून मनमिळाऊ स्वभावाची होती.काल 13 फेब्रुवारीला मृतक तरुणीचे घरमंडळी काही कामानिमित्त घराबाहेर पडले असता मुलगी एकटीच घरी होती दरम्यान घरी कुणी नसल्याचे संधी साधुन सदर तरुणीने आपल्या राहत्या घरातील बेडरूम मध्ये जाऊन सिलिंग फॅनला ओळणीच्या दुपट्ट्याने गळफास लावल्याची घटना काल रात्री 9 दरम्यान घडली. काही वेळेनंतर आई वडील घरी परतल्यानंतर मुलीच्या खोलीतील बंद दाराला ठोकून आवाज दिला मात्र बाहेर न पडल्याने बळजबरीने दार उघडले असता सदर तरुणी आत्महत्या अवस्थेत दिसल्याने घरमंडळींना एकच धक्का बसला ,तडकाफडकी नजीकच्या आशा हॉस्पिटल येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले मात्र डॉक्टरने मृत घोषित केले होते.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी त्वरित घटनास्थळ गाठून घटनास्थळाचा पंचनामा करीत मृतदेह ताब्यात घेऊन पुढील उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह शासकीय उपजिल्हा रुग्णालयात हलवून मृतकेच्या पार्थिवावर शविच्छेदन करून आजनी रोड वरील मोक्षधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.आत्महत्येचे कारण कळू शकले नसून पोलिसांनी तूर्तास आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.मृतकेच्या पाठीमागे आई वडील व एक भाऊ असा आप्तपरिवार आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

Some more glimpses of Defence Ministers’ Conclave, hosted by Raksha Mantri Rajnath Singh, on the sidelines of Aero India 2023 in Bengaluru on February 14, 2023.

Wed Feb 15 , 2023
Some more glimpses of Defence Ministers’ Conclave, hosted by Raksha Mantri Rajnath Singh, on the sidelines of Aero India 2023 in Bengaluru on February 14, 2023.  Follow us on Social Media x facebook instagram

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com