पारडी येथील खुनाचा प्रयत्न करणारा तसेच इतर ०५ गुन्हयातील पाहिजे आरोपीस अटक

नागपूर :- फिर्यादी बिसमिल्ला रफीक कनोज वय ३७ वर्ष रा. प्लॉट नं. १५२ नविन नगर प्रायमरी शाळेजवळ, पारडी हया त्यांचे दिर नामे इकबाल शेख अजिज शेख, वय ४० वर्ष, रा. गल्ली नं १, हसनबाग कब्रस्तान जवळ, नंदनवन व त्यांचे सोबत डेकोरेशनचे काम करणारे राजु शंकर धमगाये वय ३९ वर्ष रा. फिर्यादीचे घरी किरायाने व दिनेश लालदास बांते रा. नविन नगर, पारडी असे दोन मोटार सायकल वर बसुन बाराव्दारी पारडी येथून श्याम नगर कडे जात असता स्मार्ट सिटी रोड वर एक लाल रंगाची कार क्र. एम.एच. ३१ ए.जी. ८११० ही स्पीडने त्यांचे समोरून आली असता ते रोडचे बाजुला झाले. फिर्यादी यांनी कार चालकास हमारी उपर कार चला रहा क्या असे म्हटल्याने कार चालकाने कार थांबवून बाहेर आला असता फिर्यादीने त्यास ओळखले त्याचे नाव रमजान उर्फ मुनिर इकराम अंसारी वय १९ वर्ष रा. सचीना ले-आउट, आजरी माजरी, यशोधरानगर असे असुन त्याने फिर्यादीचे मुलीला मार्च २०२३ मध्ये पळवून नेल्याने गुन्हा दाखल होता व त्या गुन्हयामध्ये रमजानला पोलीसांनी अटक केली होती. वरील कारणावरून रमजान फिर्यादीचा राग करीत होता. फिर्यादीने  हमको मारेगा क्या, कैसी गाड़ी चलाता है, असे म्हटल्यावरून आरोपी रमजान याने कार मधुन चाकू काढून फिर्यादी नादिर इकबाल शेख याचे पाठीवर चाकूने वार करून गंभीर जखमी केले. सोबतचा राजु धनगाये हा त्याला वाचविण्यास गेला असता आरोपीने राजु याला पाठीवर व हातावर वार करून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करून गंभीर जखमी केले. दरम्यान फिर्यादीने तिचा मुलगा नामे साहिल रफीक कनोन वय १९ वर्ष यास फोन करून सांगितले. फिर्यादीने दोन्ही जखमींना वाचविण्याचा प्रयत्न करीत असताना तिचे उजवे हाताला चाकु लागून जखमी झाली. फिर्यादीचा मुलगा साहिल हा आला असता आरोपीने त्याचे वर सुध्दा चाकुने वार केला. त्याने तो हाताने पकडल्याने बोटांना वार लागुन जखमी झाला. आरोपी हा कार सोडून पळुन गेला. फिर्यादी व तिन्ही जख्मी उपचार करीता मेयो हॉस्पीटल येथे आले. डॉ. यानी फिर्यादीचा दिर व राजू धमगाये हे गंभीर असल्याने उपचाराकरीता दाखल करून घेतले असून त्यांचेवर उपचार सुरू आहे.. फिर्यादी व मुलाचा उपचार करण्यात आला आहे. आरोपी याने फिर्यादी व इतर जख्मी यांना जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करून गंभीर जख्मी केले. फिर्यादी यांनी दिलेल्या रिपोर्टवरून पोलीस ठाणे पारडी येथे आरोपीविरुद्ध कलम ३०७, ३२३ भा.दं.वी. अन्वये गुन्हा दाखल होता..

गुन्हयाचे समांतर तपासात गुन्हे शाखा युनिट ३ चे अधिकारी व कर्मचारी यांनी आरोपीचे अटके करीता गुप्त बातमीदार नेमले व मिळालेल्या खात्रीशिर माहिती वरून तांत्रिक तपास करून गुन्हयातील आरोपी रमजान उर्फे मुनिर इकराम अंसारी वय २१ वर्ष रा. सबीना ले-आउट, आजरी माजरी, यशोधरानगर यास सापळा रचुन ताब्यात घेतले आरोपीची अधिक चौकशी करून त्याचा अभिलेख तपासला असता आरोपी हा १) पोलीस ठाणे पाचपावली येथील कलम ३९९, ४०१ भा.द.वी. सहकलम ४/२५ भा.इ.का. सहकलम १३५ म.पो. का. चे गुन्हयात तसेच २) पोलीस ठाणे एम.आय.डी.सी. येथील कलम ३७९ भा.द.वी. ३) पोलीस ठाणे इमामवाडा येथील कलम ४५४, ४५७, ३८० भा. द.वी. ४) पोलीस ठाणे सक्करदरा येथील कलम ४५४, ४५७, ३८० भा.द.वी. ५) पोलीस ठाणे कळमणा येथील कलम ४६१, ३८० भाद्र. वी. असे एकुण ०६ गुन्हयात आरोपी हा गुन्हा केल्यापासून पळून गेला होता व पाहिजे आरोपी होता.

नमुद कामगिरी अपर पोलीस आयुक्त गुन्हे शाखा, पोलीस उप-आयुक्त (डिटेक्शन) यांचे मार्गदर्शना खाली पोनि महेश सागडे, सफी खोडे, पोहवा अनिल जैन, मुकेश राउत, प्रविण लांडे नापोअ अनुप तायवाडे, अमोल जासुद, संतोष चौधरी व सायबर टिम यांनी केली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

मा.न्यायालयातून आरोपीला शिक्षा

Wed Jul 5 , 2023
नागपूर :-दिनांक ०४.०७,२०२३ रोजी मा. अति. मुख्य न्यायदंडाधिकारी, नागपूर, यु. पी. कुलकर्णी यांनी त्यांचे कोर्टाने केस क्र. ३६६४/२०२२ पो. ठाणे अजनी येथील अप.क्र. ४५०/२०२२ कलम ४५४, ३८० भा. द.वी. या गुन्हयातील आरोपी आकाश जगदीश भातागडे, वय २६ वर्ग, रा. रहाटे नगर टोली अजनी, नागपुर याचे विरुद्ध साक्षी पुरावाअंती गुन्हा शाबीत झाल्याने आरोपीस कलम ४५४ भा.द.वी. प्रमाणे १ वर्षे सश्रम कारावासाची […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com