संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या रविदास नगर रहिवासी काली बाबा,गंगाराम अघोरी बाबा ने आपल्या भक्तगणाना माझे आयुष्य 5 हजार 520 वर्षे असून ‘मैं तो म्हैतरो का राजा हू’अश्या प्रकारचे अभद्र टिपण्णी वक्तव्य केल्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने येथील सुदर्शन समाजाच्या भावना दुखावल्या यावर संतप्त सुदर्शन समाजबांधवांनी नवीन कामठी पोलीस स्टेशनला घेराव करीत या काली बाबावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली यावर पोलिसांनी शहानिशा करून सदर काली बाबाला ताब्यात घेऊन फिर्यादी सुदर्शन समाज बहुउद्देशोय संस्था कामठी चे अध्यक्ष त्रैलोकनाथ दयाराम ग्रावकर वय 28 वर्षे रा गौतम नगर कामठी ने स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन ला दिलेल्या तक्रारीवरून आरोपी मोहन गोलप्रसाद वर्मा (काली बाबा,बाबा गंगाराम अघोरी) वय 38 वर्षे रा.रविदास नगर कामठी विरुद्ध भादवी कलम 1(1)(आर)(एस)(यु)अनुसूचितजाती,अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा(एट्रोसिटी)अनव्ये गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आजही ढोंगी बुवाबाजी ला शिक्षित अंधभक्त बळी पडत असल्याचे निदर्शनास येत आहे.तर मानसिक तणावातून सुखाच्या अपेक्षेसाठी तसेच दुःखातून निराकरण करण्याहेतु बुवाबाजी कडे धाव घेत आहेत असाच प्रकार रविदास नगर येथील आरोपी मोहन वर्मा उर्फ काली बाबाच्या घरी सुरू असलेल्या देवीच्या दरबारात भक्तगणांची हजेरी घेऊन प्रवचन देत असायचे. यातच जाती धर्म हे कुणीही निर्माण केले नसून माणसानेच माणसाला जाती धर्माच्या नावावर विखुरले आहे तर मी गंगाराम अघोरी बाबा 5 हजार 520 वर्षे आयुष्य जगणार असून मैं तो म्हैतरो का राजा हू असा उपदेश भक्तगनाना दिला. हा उपदेश व्हिडीओ सोशल मीडियावर पसरताच एका ब्राह्मण समाजाच्या ढोंगी बाबाने सुदर्शन समाजबाबतीत सार्वजनिक रित्या अभद्र टिपण्णी केल्याने यावर सुदर्शन समाजात संतापाची लाट पसरली यावर आज दुपारी 1 दरम्यान संतप्त सुदर्शन समाजबांधवांनी नविन कामठी पोलीस स्टेशन ला घेराव करून पोलिसांना वेठीस धरून आरोपी विरुद्ध आक्रोश व्यक्त केला. यावर पोलिसांनी संतप्त सुदर्शन समाजबांधवांची समजूत काढुन सदर आरोपी मोहन वर्मा (काली बाबा, गंगाराम बाबा अघोरी)विरुद्ध एट्रोसिटी चा गुन्हा दाखल करून आरोपीस ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.