कन्हान बुद्ध विहार येथे महापरित्राण पाठाने वर्षावासाची सांगता

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कन्हान :- आश्विन पौर्णिमा निमित्य बुद्ध विहार, सिद्धार्थ कॉलनी, कन्हान येथे बुद्धीस्ट वेलफेअर सोसायटी कन्हानचे अध्यक्ष आणि धम्मगुरु भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांच्या नेतृत्वात महापरित्राण पठणाचा कार्यक्रम संपन्न झाला.                 वर्षावास समाप्ती निमित्य बुद्धिस्ट वेलफेअर सोसायटी,कन्हान व बौद्ध उपासक, उपासिका व कन्हान भागातील बौद्ध अनुयायी यांनी धम्म गुरूंच्या प्रवचनानंतर सर्व भिक्षुंना चिवर दान व भोजन देण्यात आले. कन्हान बुद्ध विहाराचे भदंत आर्य केसी एस. लामा महाथेरो यांनी वर्षावासात बुद्ध आणि धम्माचे पठण केले. वर्षावास कार्यक्रमाच्या शेवटी भव्य भोजनदान कार्यक्रम संपन्न झाला. ज्याचा आस्वाद कन्हानच्या लोकांनी घेतला. या पवित्र कार्यात कन्हान भागा तील बौद्ध अनुयायांनी पाऊस-वस्ती संपवुन शांतता आणि बौद्ध धर्माचा महत्त्वपुर्ण संदेश दिला. या कार्यक्रमास बुद्धिस्ट वेलफेअर सोसायटी, कन्हान सरचिटनीस विनायक वाघधरे, कार्याध्यक्ष भगवान नितनवरे, ज्येष्ठ भीमशक्ती नेते कैलास बोरकर, कन्हान-पिपरी नगरपरिषद नगराध्यक्षा करूणा आष्टनकर, नगर सेविका कल्पना नितनवरे, अनिता पाटील, संगीता खोब्रागडे, सोसायटीचे खजिनदार चरण मोटघरे, सह सचिव शालु गजभिये, सदस्य दौलतराव ढोके, सुदाम नितनवरे, शैलेश माटे, आनंद चांहदे सह नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता पूनम उके, अतुल गजभिये, पुंडलिक मानवटकर, रमेश गजभिये, सूर्यभान ढोके, जयदेव फुलझेले, कमलाकर राऊत, केशव मेश्राम, भोजराज बंसोड, शिवशंकर भिवगडे, राजेंद्र फुलझेले, तुलसीदास गजभिये, अभिजित चांदुरकर, शीला मानवटकर, फुलवंता उके, सिंधु वाघमारे, लता मंडपे, दुर्गा मोटघरे, पिंकी मेश्राम, सुषमा बरमाटे, लीला बेलेकर, अर्चना चव्हाण, कल्पना फुलझाले, दुर्गा गजभिये सह बौद्ध अनुयायांनी अथक परिश्रम घेतले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

चंदेरी पापलेट माशाच्या विशेष टपाल लिफाफ्याचे मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते प्रकाशन

Wed Oct 12 , 2022
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्ताने विशेष टपाल तिकीट काढणार – मत्स्य व्यवसाय विकास मंत्री सुधीर मुनगंटीवार मुंबई :- भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असून, या निमित्ताने लवकरच विशेष टपाल तिकीट काढण्यात येईल असे मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. मत्स्य व्यवसाय विभाग आणि भारतीय डाक विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक फिलाटेली दिवसाच्या निमित्ताने एक जिल्हा एक उत्पादन यासाठी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!