सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय ‘आय.एस.ओ.’ ने मानांकित

नागपूर :- कार्यालयाची आकर्षक सजावट कार्यालयाकडून देण्यात येणाऱ्या सुविधा, कर्मचाऱ्यांना उपलब्ध केलेल्या सुविधा लक्षात घेऊन नागपूर जिल्ह्यातील सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयाला ‘आय.एस.ओ.’ प्रमाणपत्राने मानांकित केले आहे.

नागपूर जिल्हयात प्रथमच जेष्ठ नागरिकांसाठी कार्यालयात जेष्ठ नागरिक कक्ष स्थापन करण्यात आलेले असून जिल्हयातील जेष्ठांच्या समस्या या कक्षामार्फत समुपदेशनाव्दारे सोडविण्याचे काम नियमितपणे केले जाते. सर्व योजनांचे सविस्तर माहिती असलेले फलक दर्शनी भागात लावण्यात आलेले आहे. विभागामार्फत विविध लोक कल्याणकारी योजना राबविण्यात येत असून त्याचा लाभ जास्तीत जास्त व्यक्तींना विहित मुदतीत देण्यासाठी सर्व योजनांची माहिती एका क्लिकवर उपलब्ध करण्याचे दृष्टिकोनातून Digital Standy कार्यालयात लावण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे सर्व योजनांची तातडीने अंमलबजावणी होण्यास सुकर झाले आहे.

विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या सर्व लोककल्याणकारी योजनांचे अभिलेख व्यवस्थित जतन करुन सुस्थितीत ठेवण्यासाठी नस्त्यांची निंदणीकरण व वर्गीकरण करण्यात आली आहे. तसेच अभिलेख कक्षात एका कर्मचाऱ्याची अभिलेखापाल म्हणून नेमणूक करण्यात आलेली असून अद्ययावत प्रणालीच्या माध्यमातून दीर्घ कालावधीचा जुना अभिलेख सहज व सुलभपणे लवकर उपलब्ध होण्यास मदत होऊन वेळेची बचत होते. पर्यावरणपूरक सौर ऊर्जा प्रणाली बसवून ऊर्जेची व आर्थिक बचत मोठया प्रमाणात होत आहे. कार्यालयाचे परिसरात अधिकारी, कर्मचारी व नागरिकांकरीता ग्रीन जिम असून त्याचा वापर आरोग्याच्या दृष्टिकोनातून व्यायामासाठी केला जातो. खेळण्यासाठी कार्यालयाचे परिसरात मैदान उपलब्ध असून त्याचा वापर केला जातो. सहायक आयुक्त, समाज कल्याण सुकेशिनी तेलगोटे यांच्या मार्गदर्शनात अनेक नविन उपक्रम राबविले जात आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

मुंबई हल्ल्याची 15 वर्षे...3

Thu Nov 30 , 2023
“देव तारी तया कोण मारी” मोशे आता झालाय् तरुण पाकिस्तानी दहशतवाद्यांनी मुंबईवरील हल्ल्याची सुरुवात कुलाब्यातील ज्यूंचे सिनेगॉग असलेल्या नरिमन (छाबाड) हाऊसपासून केली. येथे 2 अतिरेक्यांनी 3 दिवसात 9 माणसे मारली. त्यात पुजारी (रबी) Gabriel Holtzberg आणि त्याची गरोदर पत्नी Rivka Holtzberg या दोघांचा बळी गेला. मात्र त्यांचा अवघ्या 2 वर्षांचा मुलगा Moshe Holtzberg केवळ दैवयोगाने बचावला. त्याची दायी Sandra Samuel […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com