निवडणूकीच्या पाश्वरभूमीवर इच्छुक उमेदवार लागले कामाला!

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 
कामठी ता प्र 25 :- येत्या काही दिवसांमध्ये कामठी नगर परिषद ची निवडणूक प्रक्रियेचा डंका वाजणार आहे. अश्यातच आता विद्यमान नगरसेवकासह निवडणुकीच्या रिंगणात उतरणारे इच्छुकांचे दर्शन देखील आता व्हायला लागले आहे.आणि आताच्या निवडणुकीच्या काळात काही अपवाद व्यक्ती वगळता कधी न दिसणारे चेहरे ही समाजसेवेत उतरले दिसून येत आहेत त्यातच आगामी निवडणुकीच्या पाश्वरभूमीवर हवसे नवसे व इच्छुक उमेदवार आतापासूनच निवडणुकीच्या कामाला लागले आहेत.
निवडणुकीच्या पाश्वरभूमीवर रिंगणातील उमेदवारांचा शो ऑफ दिसून येत आहे.ही परिस्थिती शहरातील एकाच प्रभागातील नसून बहुतांश भागात अश्याच प्रकारचा शो ऑफ दिसून येत आहे.अश्यातच आता काही समस्या असल्यास अर्ध्या रात्रीही कळवा अशी बतावणी या काळात इच्छुक उमेदवाराकडून केली जात आहे.त्यामुळे शहरात निवडणुकीचे वारे घुसल्याचे दिसून येत आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

घरफोडी व वाहन चोरी करणाऱ्या टोळीला केले जेरबंद ; स्थानिक गुन्हे शाखेची कार्यवाही

Sat Jun 25 , 2022
 – 18 मोटर सायकलीसह  एकुण 13,33,500/- रुपयांचा मुद्देमाल जप्त… नागपुर – नागपूर ग्रामीण हद्दीत मोटर सायकली चोरीचे प्रमाण वाढले असल्याने नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक विजय मगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे यांचे नेतृत्वात विषेश पथक तयार केले. सदर विषेश पथकास दि. 24/06/2022 रोजी मुख्याबिराव्दारे खात्रीशिर माहिती मिळाली की, मौदा परिसरातील काही युवकांची टोळी मौदा, उमरेड, कुही परिसरात […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com