घरफोडी व वाहन चोरी करणाऱ्या टोळीला केले जेरबंद ; स्थानिक गुन्हे शाखेची कार्यवाही

 – 18 मोटर सायकलीसह  एकुण 13,33,500/- रुपयांचा मुद्देमाल जप्त…

नागपुर – नागपूर ग्रामीण हद्दीत मोटर सायकली चोरीचे प्रमाण वाढले असल्याने नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक विजय मगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे यांचे नेतृत्वात विषेश पथक तयार केले. सदर विषेश पथकास दि. 24/06/2022 रोजी मुख्याबिराव्दारे खात्रीशिर माहिती मिळाली की, मौदा परिसरातील काही युवकांची टोळी मौदा, उमरेड, कुही परिसरात मोठया प्रमाणावर मोटर सायकलींची चोरी आहेत व त्यांनी नागपूर कलकत्ता महामार्गावरील चौधरी ढाब्याच्या मागे खुल्या जागेत चोरी केलेले वाहने ठेवलेले असून संबधीत वाहने विक्री करीता घेवून जाणार आहेत. अशी माहिती विषेश पथकास प्राप्त झाली. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखचे पथक चौधरी ढाब्याच्या मागील खुल्या जागेत गेले असता त्याठिकाणी त्यांना 6 इसम एकुण 16 मोटार सायकलीसह मिळून आले. त्यांना नमुद वाहनाबाबत विचारपुस केली असता त्यांनी संशयास्पद उत्तरे दिली. त्यामुळे सदरची वाहने चोरीची असल्याचे दाट संशय निर्माण झाल्याने सर्व वाहनाची पहाणी केल्यानंतर असे दिसून आले की, बÚयाच वाहनांना नंबर प्लेट काढून ठेवलेले होते तर काही वाहनांचे नंबर प्लेटवर वाहनाचा नंबर टाकलेला नव्हता. त्यामुळे राश्ट्रीय गुन्हे अभिलेख प्रणालीच्या वाहन समन्वये या पोर्टलवरुन सदर वाहनांचे चेसीस क्रमांकाची पडताळणी केली असता वरील सर्व वाहनांचे मुळ नोंदणी क्रमांक मिळून आले. मिळून आलेल्या मुळ वाहनांचे नोंदणी क्रमांकाची गुन्हे अभिलेखावरुन तपासणी केली असता वरील सर्व वाहने हे नागपूर ग्रामीण हद्दीतील पोलीस ठाणे मौदा, उमरेड, व कुही येथे चोरीस गेल्याबाबत गुन्हे नोंद असल्याची माहिती मिळून आली. त्याआधारे मिळून आलेल्या आरोपीपैकी 1) निखिल ज्ञानेश्वर पुडके, वय 20 वर्ष, रा. धानोली, पो. इंदोरा, ता. मौदा, जि. नागपुर यास संबधीत वाहनाबाबत विचारपुस केली असता त्याने सांगीतले की, सदरचे वाहने हे मी माझे इतर साथीदाराचे मदतीने वेगवेगळया ठिकाणांहुन चोरी केले असून आज रोजी सदरची वाहने विक्री करीता घेवून जाणार होतो व चोरीचे वाहने विक्री करुन मिळणारी रक्कम आपसात वाटप करणार होतो. असे सांगीतल्याने त्याचे इतर साथीदारांना त्यांचे नाव पत्ते विचारले त्यांनी आपले नाव अनुक्रमे 2) तेजस ज्ञानेश्वर झाडे, वय 21 वर्ष, रा. बोरी गवारी, पो. इंदोरा, ता. मौदा जि. नागपुर, 3) भावेश किशोर जुनघरे वय 18 वर्ष रा. वार्ड क्र. 3 वडोदा ता. कामठी 4) पियुश अजय मस्के वय 19 वर्ष रा. वार्ड क्र. 3 वडोदा ता. कामठी 5) मयुर मोरेश्वर भोयर वय 19 वर्ष रा. शहीद चौक वडोदा ता. कामठी 6) सुयश दिवाकर भिसेकर वय 19 वर्ष रा. वार्ड क्र. 3 वडोदा ता. कामठी असे सांगीतले. मिळून आलेल्या आरोपींची कसून चौकशी केली असता आरोपींनी आजपावेतो जवळपास 16 ठिकाणी मोटार सायकल चोरी केल्याच्या घटनेबाबत सांगीतले. त्यावर त्यांची अंगझडती घेतली असता आरोपी निखिल ज्ञानेश्वर पुडके याचेजवळ सोन्याचे लगड मिळून आली त्याबाबत त्यास विचारपुस केली असता सदरचे सोने हे त्यांनी आपले साथीदाराचे मदतीने मौजा धानोली येथे एका घरातुन चोरी केले असल्याचे सांगीतले. त्यावरुन त्यांनी मोटार सायकल चोरी व्यतिरीक्त घरफोडीचे सुध्दा गुन्हे केले असल्याची शक्यता वाटल्याने त्या अनुशंगाने विचारपुस केली असता मौजा धानोली येथे एकुण दोन घरफोडीचे गुन्हे केल्याची माहिती दिली. मिळून आलेल्या अरोपींकडून पुढील प्रमाणे मोटरसायकल व मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

मोटर सायकल चोरी

1) पो. ठाणे मौदा अप.क्र. 1) 368/22, 2) 363/22, 3) 373/22, 4) 369/22, 5) 383/22, 6) 358/22,
7) 357/22, 8) 386/22, 9) 350/22, 10) 345/22 आणि अप.क्र. 11) 320/22 कलम 379 भादवि
2) पोलीस ठाणे उमरेड अप.क्र. 1) 388/22 आणि अप.क्र. 2) 391/22 कलम 379 भादवि
3) पोलीस ठाणे कुही अप.क्र. 1) 236/22 आणि अप.क्र. 2) 219/22 कलम 379 भादवि
4) पोलीस ठाणे नंदनवन नागपुर शहर अप.क्र. 204/22 कलम 379 भादवि

घरफोडी

1) पोलीस ठाणे अरोली अप.क्र. 1) 67/2022 आणि 2) अप.क्र. 88/2022 कलम 454, 457, 380 भादवि
वरील प्रमाणे चोरीच्या 16 मोटर सायकल व गुन्हा करण्याकरीता वापरलेले 2 मोटर सायकल असे एकुण 18 मोटर सायकली तसेच 02 घरफोडीचे गुन्हे उघडकिस आले असून आरोपीतांचे ताब्यातून एकुण 13,33,500/- रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. मिळून आलेल्या वाहनांमध्ये प्रामुख्याने रायल इनफिल्ड बुलेट, हिरो स्प्लेन्डर प्लस, पॅशन, बजाज पल्सर, अॅक्टीव्हा आणि टि.व्ही.एस. ज्युपीटर या वाहनांचा समावेश आहे.वाहन चोरीबाबत मुख्य आरोपी निखील पुडके यास विचारपुस केली असता त्याने सांगीतले की, त्याने डिझेल मेकॅनिक या क्षेत्रात आय.टी.आय. चे शिक्षण घेतले असून दुचाकी वाहने चाबी न वापरता डायरेक्ट कनेक्षन करुन सुरु करुन वाहन चोरी करण्याचे ज्ञान यू-टयूबवरुन घेतले असल्याची माहिती दिली. मिळून आलेले सर्व आरोपी एकमेकांना चांगल्याप्रकारे ओळखत असून दिवसा कोणते वाहन चोरी करणे सोपी जाईल याची रेकी करुन रात्रीचे वेळेस त्यांचे स्वतःचे दुचाकीवर सोबत जावून वेगवेगळया परिसरातून वाहने चोरी करुन आनत असत व ग्राहक मिळेपर्यंत चौधरी ढाब्याचे मागे जमा करुन ठेवत असत.
सदर कार्यवाही ही नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर व अपर पोलीस अधीक्षक राहुल माकणीकर यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखा, नागपूर ग्रामीणचे पोलीस निरीक्षक  ओमप्रकाश कोकाटे, सहा. पोलीस निरीक्षक, राजीव कर्मलवार, जितेंद्र वैरागडे, अनिल राऊत, पोलीस हवालदार विनोद काळे, ज्ञानेश्वर राऊत, नरेंद्र पटले, अरविंद भगत, राजेन्द्र रेवतकर, पोलीस नायक शैलेश यादव, अमोल वाघ, प्रणय बनाफर, अमृत किनगे, रोहन डाखोरे, विरेन्द्र नरड चालक सहा.फौज. साहेबराव बहाळे, पोकॉ आशुतोष लांजेवार तसेच सायबर सेलचे नायक सतिश राठोड यांनी पार पाडली.

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com