सीताबर्डीत संगम चाळेच्या भिंती कोसळल्याने उपमुख्यमंत्री निधीतून बांधणी कराव्या – अमर पारधी

नागपूर :-भारतीय जनता पार्टी पश्चिम नागपूर यांच्या वतीने अमर महेश पारदे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिले त्यामध्ये सीताबर्डी संगम चाळ येथून वाहणाऱ्या नागनदीच्या भिंती पावसाळ्यात नदीमध्ये कोसळल्या आणि आजूबाजूंचे रस्ते ही खराब झाले त्याबद्दल अमर पारधी यांनी व सोबत कार्यकर्ते मिळून निवेदन दिले.

मागे झालेल्या जोरदार पावसामुळे नागनदी मुळे भरपूर पाणी वाहत होते. पाण्याच्या वेगाने नाग नदीच्या आजूबाजूला असलेल्या संरक्षक भिंती नदीच्या आत मध्ये पडून गेल्या. तसेच नदीच्या बाजूंचे रस्तेही खराब झाले. नागपूर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना सांगितले असता, त्यांनी काम केले नाही. त्यांनी पाहणी सुद्धा केली नाही. या नदीवर इंग्रजांच्या काळापासूनचे पूल आणि बाजूचे रस्ते त्यांनाही दुरुस्तीची पूर्ण बांधण्याची आवश्यकता आहे. निवेदनात संपूर्ण परीने लिहिल्याप्रमाणे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती केली की, पडलेल्या भिंतीत खराब झालेले आहेत. म्हणून उपमुख्यमंत्री निधितून बांधून द्यावे. अशी विनंती अमर पारधी यांनी केली आहे

 

NewsToday24x7

Next Post

Maharashtra Girls team won GOLD medal in 37th Youth Basketball Championship at Indore

Sat Dec 31 , 2022
Nagpur :- Maharashtra Girls team won GOLD medal in 37th Youth Basketball Championship at Indore MP. When Maharashtra Olympic association not allowing Maha Basketball Association to conduct Mini Olympic in Maharashtra, the Basketball Federation of India recognized Maha Basketball Association teams giving back to back performances at the top level at the Nationals. Last month Maha Basketball Association’s Sub Junior […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com