मुंबई :- अबू धाबीचे राजकुमार शेख खालेद बीन मोहम्मद बीन झायेद अल नाहयान यांचे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे दुपारी १.२० वाजता आगमन झाले. यावेळी मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, मुख्य सचिव सुजाता सौनिक, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अप्पर मुख्य सचिव आणि मुख्य राजशिष्टाचार अधिकारी मनीषा म्हैसकर, पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी यावेळी स्वागत केले.
यावेळी राजशिष्टाचार विभाग तसेच पोलीस दलाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. हॉटेल ट्रायडन्ट, मुंबई येथे पुढील नियोजित कार्यक्रमासाठी ते रवाना झाले.