मुंबई :- ग्रॅण्ड डच ऑफ लक्झेम्बर्ग’ यांचे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे आज आगमन झाले.
यावेळी मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, क्रीडा विभागाचे उपसचिव सुनील हांजे यांनी ग्रॅण्ड डच ऑफ लक्झेम्बर्ग यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
यावेळी लक्झेम्बर्गचे राजदूत पेगी प्रात्झझेन, राजशिष्टाचार व पोलीस दलाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. तेथून ग्रॅण्ड डच ऑफ लक्झेम्बर्ग हे मुंबईतील नियोजित कार्यक्रमासाठी रवाना झाले.