नागपूर :-जिल्हा न्यायालय आवारात एका युवकाजवळ शस्त्र मिळून आले. पोलिसांनी घेतलेल्या झडतीत एक चाकू हाती लागला. या तरुणाला सदर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. स्वप्नील गजभिये (28, खापरखेडा) असे अटकेतील युवकाचे नाव आहे.
स्वप्नील हा शुक्रवारी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास जिल्हा न्यायालय परिसरात शिरला. चौकीतील पोलिसांनी बॅगची झडती घेतली असता त्याच्याजवळ एक चाकू मिळून आला. जिल्हा न्यायालय परिसरात येण्याचे कारण विचारले असता तो पोलिसांना उडावा उडवीची उत्तरे देत आहे. पुढील तपास सदर पोलिस करीत आहेत.