नागपूर :- गुन्हेशाखा युनिट क. ३ चे अधिकारी व अंमलदार हे पोलीस ठाणे जुनी कामठी हद्दीत आरोपोंचे शोधात पेट्रोलींग करीत असतांना, त्यांना आरोपी नामे पंकज उर्फ चिलचिल्या सुरेश शिंदे वय २८ वर्ष रा. नंदनवन झोपडपट्टी, गल्ली नं. १३, नागपुर हा दिसल्याने त्यास ताब्यात घेतले. आरोपीचा अभिलेख तपासला असता त्यास पोलीस ठाणे नंदनवन येथुन मा. पोलीस उप आयुक्त परि. क. ४ यांनी त्यांचे आदेश क. १/२०२४ नुसार तामीली दिनांक ०४.०५.२०२४ रोजी पासुन ०१ वर्षाकरीता नागपूर शहर व नागपूर ग्रामीण हडीतुन हद्दपार केल्याचे दिसुन आले. आरोपी हा विनापरवाना नागपूर शहर हद्दीत मिळुन आल्याने, त्याने हहपार आदेशाचे उल्लंघन केल्याने त्यास ताब्यात घेण्यात आले. याप्रकरणी पोलीस ठाणे जुनी कामठी येथे आरोपीविरूध्द कलम १४२ म.पो.का. अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.