हिट अँड रन च्या केस मध्ये त्या कारचालकाला अटक करा, बसपाची मागणी

– पाच वर्षाच्या बालिकेचा अपघाती मृत्यू

नागपूर :- कामठी निवासी राजेश भीमराव डहाट हे आपली पत्नी भाग्यश्री, मुलगा द्रोवील व मुलगी आलिशा यांना मोटर सायकलने कामठी कन्हान महामार्गाने देवलापार कडे होळीच्या दिवशी 25 मार्च 24 रोजी जात असताना काळ्या रंगाच्या कारणे त्यांना जोरदार धडक दिली. या धडकेत त्यांची पाच वर्षाची आलिशा नावाची मुलगी गंभीर जखमी झाल्याने तिला चौधरी हॉस्पिटल, आशा हॉस्पिटल व नंतर तिथून मेयो हॉस्पिटल येथे उपचारासाठी नेण्यात आल्यावर तिला मृत घोषित करण्यात आले.

ही अपघाताची घटना घडली ते कमसरी बाजार रोड कंट्रोलमेंट चेकपोस्ट जवळ असल्याने त्या परिसरात अनेक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लागलेले आहेत अपघात ग्रस्त लोकांनी त्या कारचे अंदाजे नंबर सांगून वर्णन सुद्धा केलेले आहे. परंतु स्थानिक पोलिसांनी त्याकडे पूर्णता दुर्लक्ष केल्याचा शिष्टमंडळाने आरोप केला. त्या घटनेला दोन महिने होऊनही अजून पर्यंत त्या कारचालकाला अटक करण्यात आलेली नाही. घटनेच्या दिवशी स्थानिक नागरिकांनी कामठी पोलीस स्टेशनला घेराव घातल्याने त्या कारचालकाला विना विलंब अटक करण्याचे आश्वासन दिले होते.

त्या खुनी कार चालकाला विना विलंब हिट अँड रन कायद्या अंतर्गत अटक करून कार्यवाही करावी व शासनातर्फे दहा लाखाचा निधी देण्यात यावा अन्यथा बसपा तर्फे आंदोलन करण्यात येईल असा इशारा शिष्टमंडळाद्वारे देण्यात आला. या मागणीसाठी काल आलिशा च्या परिवाराला घेऊन बसपाच्या शिष्टमंडळाने नागपूरचे पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल यांची भेट घेऊन निवेदन दिले.

शिष्टमंडळात नागपूर जिल्हा अध्यक्ष संदीप मेश्राम, प्रदेश मीडिया प्रभारी उत्तम शेवडे, जिल्हा प्रभारी राहुल सोनटक्के, कामठीचे माजी विधानसभा अध्यक्ष इंजिनीयर विक्रांत मेश्राम, मृतक अलिशा चे वडील राजेश, आई भाग्यश्री, भाऊ द्रोविल तसेच विशाल गजभिये, दिपाली गजभिये, निशिकांत टेंभेकर आदीं पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा समावेश होता.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

न्यायालयाने स्टे दिल्यानंतरही केली जमिनीची विक्री

Sat May 18 , 2024
– शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख दिवाकर पाटणे यांच्याकडून शेतकऱ्याची फसवणूक – पीडित शेतकऱ्याची न्यायासाठी धडपड नागपूर :- नागपूर तालुक्यातील व कळमेश्वर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील मौजा खडगाव प.ह.न. १४१ मधील ४ एकर जमिन शिवसेना शिंदे गटाचे सहसंपर्क प्रमुख दिवाकर पाटणे यांनी परस्पर विकून शेतकऱ्याची फसवणूक केली आहे. पीडित शेतकऱ्याचे नाव दिगांबर ठाकरे आहे. विशेष म्हणजे या जमिनीचे प्रकरण न्यायालयात न्यायप्रविष्ट आहे आणि […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!