– पोलीस स्टेशन देवलापारची कारवाई
देवलापार :- अंतर्गत ०१ कि. मी. अंतरावरील मौजा देवलापार पोस्टे समोर एन. एच.-४४ जबलपूर ते नागपूर रोड येथे दिनांक २३/१२/२०२३ चे ०२.३० वा. ते ०३.०० वा. दरम्यान देवलापार पोलीस पथक पेट्रोले ग करीत असतांना त्यांना गुप्त माहिती मिळाली की, एक इसम विनापरवाना व अवैधरीत्या जनावरांना निर्दयतेने कोंबुन वाहतुक करीत आहे. अशा मिळालेल्या गुप्त माहिती वरुन देवलापार पोलीस पथकाने तात्काळ घटनास्थळी जावून नाकाबंदी करुन आरोपी एक पांढ-या रंगाची बोलेरो पिकअप क्र. MP 21 ZB 5195 चा चालक आरोपी नामे-चैतराम रामदास यादव, रा. पोसरा, कटनी, मध्यप्रदेश याने आपल्या ताब्यातील वाहनात १४ गोवंश जनावरे हे अतिशय आखुड दोराने बांधुन एकमेकांवर रचुन कोणतीही बसण्याची व चारापाण्याची व्यवस्था न करता कत्तली करीता वाहतुक करिता नेत असताना मिळुन आल्याने आरोपीच्या ताब्यातून एकुण गोवंश किंमती १,२८,०००/- रु. चा व पांढन्या रंगाची बोलेरो पिकअप MP 21 ZB 5195 अंदाजे किंमती ६,००,०००/- रु. असा एकुण ७,२८,०००/- रु. चा मुद्देमाल मिळुन आल्याने जप्त करून १३ जिवंत गोवंश व ०१ मयत गाय गोवंश श्रीकृष्ण गौरक्षण संस्था, गोंडखैरी, ता. नरखेड, जि. नागपुर येथे दाखल करण्यात आले आहे.
सदर प्रकरणी सरकारतर्फे पोशी सचिन भगवान येळकर, पो.स्टे. देवलापार यांचे रिपोर्टवरून पो.स्टे. देवलापार येथे आरोपीविरुध्द कलम २७९, ४२९ भा.द.वि सहकलम ११(१), (इ) प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम सहकलम ५ अ, ९ महाराष्ट्र प्राणि संरक्षण अधिनियम सहकलम ११९ मपोका. सहकलम १८४ मोवाका, काद्ययान्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. यातील आरोपीस अटक करण्यात आली असुन गुन्हयाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गायकवाड हे करीत आहे.