नागपूर :-अ) दिनांक १५.०५.२०२३ चे ००.०० वा. ते दि. ०३.०६.२०२३ चे ००.०० वा. चे दरम्यान फिर्यादी वंदना कमलेश उके, वय ५३ वर्ष, रा. नाईक तलाव, बांग्लादेश, हिरव्या झेंडा जवळ, नागपुर, त्यांचे घराचे दाराला कुलूप लावून बाहेरगावी गेल्या असता, कोणीतरी अज्ञात चोरटयाने त्यांचे घराचे मुख्य दाराचे कुलूप कडी-कोंडा तोडुन घराचे आत प्रवेश करून बेडरूम मधील लोखंडी आलमारी मधील सोन्या-चांदीचे दागीने व नगदी ५२,०००/ रु. असा एकूण १,८८,५०० रू. चा मुद्देमाल चोरून नेला. फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून पो. ठाणे पाचपावली येथे अज्ञात आरोपी विरुध्द कलम ४५४, ४५७, ३८० भादंवि अन्वये गुन्हा नोंद होता.
सदर गुन्हयाचे समांतर तपासात गुन्हे शाखा युनिट क ०३ चे अधिकारी व अंमलदार यांनी मिळालेल्या खात्रीशिर माहीतीवरून सापळा रचुन आरोपी १) हर्ष उर्फ छोटु योगेश डेलीया वय १९ वर्षे, रा. धम्मदिप नगर, यशोधरा नगर, २) मयंक उर्फ बरसो वरसिंग शाहु वय २२ वर्ष रा. विटभट्टी चौक, यशोधरा नगर यांना ताब्यात घेवून त्यांची विचारपुस केली असता आरोपांनी वर नमुद गुन्हा केल्याची कबुली दिली. आरोपींना नमुद गुन्हयात अटक करण्यात आली. आरोपींची सखोल विचारपुस केली असता, आरोपींनी पो.ठाणे यशोधरानगर हद्दीत ०२ ठिकाणी लोखडी तराफे चोरी केल्याची तसेच पो. ठाणे माणकापुर हद्दीत लोखंडी तराफे चोरी केल्याची कबुली दिली. आरोपीचे ताब्यातून सोन्या-चांदीचे दागिने किंमती ६३,०८२ /- रू. चा मुद्देमाल तसेच चोरी केलेले लोखंडी तराफे किंमती १,३०,०००/-रु. असा एकूण १,९३,०८२/- रू. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपीचे इतर साथीदारांचा शोध सुरू आहे. आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील कार्यवाही करीला पो. ठाणे पाचपावली यांचे ताब्यात देण्यात आले.
ब) गुन्हेशाखा युनिट क ३ चे नायक पोलीस अंमलदार अनुप तायवाडे यांचे मोबाईलवर एक इसम कार चालवित असतांना, त्याने त्याचे मांडीवर चाकू ठेवल्याबाबतचे व्हिडीओ प्राप्त झाले होते. गुन्हेशाखा युनिट क. ०३ अधिकारी व अंमलदार यांनी सायबर सेल गुन्हे शाखा यांचे मदतीने अवघ्या एक तासाने आत व्हिडीओ मध्ये दाखविलेले आरोपी क्र. ०१) शुभम गजानन निबुळकर, वय २४ वर्षे, रा. विजयनगर, एखाइडे ले-आऊट, प्लॉट नं. ६२, एम.आय.डी.सी. नागपुर, आ.क. ०२) रितीक सुरेंद्र हरणे, वय २१ वर्षे, रा. बेसा, हरीहर नगर, प्लॉट नं. १ बी. बेलतरोडी नागपुर यांना पो. ठाणे एम.आय.डी.सी. हद्दीतुन दाते ले-आऊट येथून ताब्यात घेवुन त्यांचे कडुन एक लोखंडी चाकु, एक तलवार, मोबाईल फोन आणि हुंदाई कंपनीची कार असा एकूण ३,७६,४००/- रु. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपी विरुध्द कलम ४+२५ भाहका सहकलम १३५ मोका अन्वये गुन्हा दाखल करून आरोपीना अटक करण्यात आलो. आरोपींचा अभिलेख तपासला असता त्यांचेविरुध्द शरीराविरूध्द गंभीर गुन्हे दाखल आहेत.
वरील कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त, गुन्हे संदीप पाटील, पोलीस उपआयुक्त (डिटेक्शन) मुम्मका सुदर्शन, सपोआ. संजय जाधव यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सागडे, सपोनि. पवन मोरे, सचिन भोंडे, पोउपनि मधुकर कोठाके, बलराम झोडोकर, सफ, ईश्वर खोरडे, पोहवा. दशरथ मिश्रा, शाम अंगथुलेवार, आनंद काळे, नापोअ. फिरोज शेख, अनिल बोटो, पो. विशाल रोकडे, रविंद्र करदाते जिनेश रेड्डी, दिपक दासलवार, दिपक लाकडे यांनी केली.