पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या गॅरंटीवर जनतेचा विश्वास

 रामटेकच्या ‘धनुष्य-बाण’ संसदेत पोहचवा : राजू पारवे

 जनसंवाद रथ यात्रेला उमरेड विधानसभा क्षेत्रात उत्स्फूर्त प्रतिसाद

 गावो-गावी ‘महायुती’ कार्यकर्त्यांनी केला एकजुटीने प्रचार

शिवापूर :- प्रधानमंत्री मोदींच्या नेतृत्वात देशाचा गेल्या दहा वर्षात शेतकरी, गोरगरीब, महिला आणि विद्यार्थ्यांचा मोठ्या प्रमाणात विकास झाला. त्यांनी राबविलेल्या विविध योजनांतून झालेल्या बदलामुळे दारिद्र्यरेषेतून कोट्यवधी जनता आज बाहेर पडली आहे, असे प्रतिपादन रामटेक लोकसभेचे महायुतीतील शिवसेना उमेदवार राजू देवनाथ पारवे यांनी केले. विकासाच्या गती व पंतप्रधान मोदींच्या गॅरंटीवर विश्वास ठेऊन रामटेकच्या ‘धनुष्य बाण’ला संसदेत पोहचवा, असे आवाहन त्यांनी केले.

शुक्रवारी उमरेड विधानसभा क्षेत्रातील भिवापूर तालुक्यातील शिवापूर येथून जनसंवाद रथ यात्रा प्रचार दौऱ्याची सुरुवात करण्यात आली. शिवापूर येथे आयोजित प्रचार सभेत राजू पारवे हे बोलत होते. राजू पारवे म्हणाले की, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनात महायुती सरकारने गावापासून ते शहरापर्यंतचा विकास करण्याचे ध्येय हाती घेतले आहे. गेली साडेचार वर्ष उमरेड क्षेत्राचा आमदार म्हणून सर्व सामान्यांच्या प्रश्न सोडविण्याचे काम करीत आहे. महायुती सरकारने दीड वर्षात 3 हजार कोंटींचा निधी दिला उमरेडसाठी दिला. माझ्या कामाची पावती म्हणून सर्वसामान्य कार्यकर्त्याला रामटेक लोकसभा क्षेत्राचा विकास करण्याची संधी महायुती सरकारने दिली आहे. मोदींच्या नेतृत्वात देशातून भ्रष्टाचार, दडपशाही आणि हिंदू विरोधी शक्तींचे उच्चाटन होऊन देशात हिंदूत्वाचा पाया मजबूत झाला आहे, असेही ते म्हणाले.

याप्रसंगी महायुतीचे नेते आनंदराव पाटील, डॉ. मेश्राम, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष संदीप इटकेलवारसह भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले), पीपल्स रिपब्लिकन पार्टी, बहुजन एकता मंच, रासप तसेच महायुतीतील सर्व घटक पक्षातील नेते, पदाधिकारी कार्यकर्ते तसेच सर्व सामान्य जनता मोठ्या संख्येने उपस्थिती होती. 

जनतेचा विकासच करणार

पंतप्रधान मोदी यांनी केलेल्या 10 वर्षात केलेल्या विकास कामाच्या गॅरंटीवर मी आपल्यापुढे आलो आहे. म्हणून ही निवडणूक महत्वाची आहे. रामटेक नेहमीच शिवसेनेसोबत राहिला आहे. मी फक्त आपल्याला विकास देऊ शकतो.

शिवापूर, नवेगाव देशमुख, भिवापूर,धामनगावात पदयात्रेत गावकऱ्यांचा सहभाग

उमरेड विधानसभा क्षेत्रात येणाऱ्या शिवापूर, सरांडी, मांडवा सोम, हेवती, वासी, कारगाव, सालेभट्टी पून., नवेगाव देशमुख, थूटान बोरी, रानमांगली, मरुपार पुन., पांजरेपार पुन., जवराबोडी, तास, सोमनाळा, पुल्लर, भिवापूर शहर, चिखली, रोहणा, मेढा, झिलबोडी, हत्तेबोडी, धामनगाव वि. म, टाका, पांढरवाणी, बोर्डकला, उखळी, मालेवाडा, पाहमी, उखळी, मालेवाडा, पाहमी, नवेगाव साधू, ठाणा, हेवती, वायगाव घो., उमरेड शहर या गावात जनसंपर्क पदयात्रा आणि कॉर्नर सभेचे आयोजन करण्यात आले. या जनसंवाद रथ यात्रेचा उमरेड शहरात रात्री झालेल्या भव्य प्रचार सभेनंतर समारोप झाले. तत्पूर्वी, प्रत्येक गावातील मुख्य चौकात आणि वस्तीमध्ये शिवसेना, भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, पीपल्स रिपब्लिकन पार्टी, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले), बहुजन रिपब्लिकन एकता मंच, रासपसह महायुतीच्या घटक पक्षातील शेकडो कार्यकर्ते तसेच नागरिकांचा सहभागाने जनसंवाद रथ यात्रा नागरिकांचे लक्ष वेधून घेत होती.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

काँग्रेस, नॅशनल कॉन्फरन्स, पीडीपी ने केले जम्मू-काश्मीरचे अतोनात नुकसान - पंतप्रधान मोदी यांचे उधमपूरमधून विरोधकांवर शरसंधान

Sat Apr 13 , 2024
उधमपूर :- काँग्रेस, नॅशनल कॉन्फरन्स आणि पीडीपीसारख्या घराणेशाही पक्षांनी जम्मू-काश्मीरचे अतोनात नुकसान केले आहे, यंदाची लोकसभा निवडणूक देशात मजबूत सरकार स्थापनेसाठी आहे. विकसित जम्मू-काश्मीरसाठी जम्मू-काश्मीरमधील सर्व जागांवर प्रचंड बहुमताने एनडीए ला निवडून द्या, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी जम्मू काश्मीरमधील उधमपूर येथील विराट जाहीर सभेत केले. काँग्रेस, नॅशनल कॉन्फरन्स ,पीडीपी या पक्षांना जम्मू – काश्मीरच्या विकासाशी काही देणेघेणे […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com