कान्होबा विसर्जनाकरिता मनपाकडून कृत्रिम टँकची व्यवस्था

नागपूर :-श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त घराघरात स्थापन करण्यात आलेल्या कान्होबाच्या विसर्जनाकारिता नागपूर महानगरपालिकेद्वारा शहरातील विविध तलाव परिसरात कृत्रिम टँकची व्यवस्था करण्यात आली आहे. भाविकांनी मनापाद्वारे करण्यात आलेल्या व्यवस्थेचा लाभ घ्यावा असे आवाहन मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले आहे.

मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या निर्देशानुसार, अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल यांच्या मार्गदर्शनात व मनपाचे घनकचरा व्यवस्थापन विभाग प्रमुख डॉ. गजेंद्र महल्ले यांच्याद्वारे श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या अनुषंगाने मनपा झोन निहाय श्रीकृष्ण मूर्ती विसर्जनाकरिता कृत्रिम टँक आणि निर्माल्य कुंडीची व्यवस्था करण्यात आली आहे.

नागपूर महानगरपालिकेतर्फे लक्ष्मीनगर झोन अंतगर्त येणाऱ्या सोनेगाव तलावाजवळ एक, धंतोली झोन अंतर्गत येणाऱ्या शुक्रवारी तलावाजवळ दोन, नेहरूनगर झोन अंतगर्त येणाऱ्या सक्करदरा तलावाजवळ पाच, गांधीबाग झोन अंतगर्त येणाऱ्या महाल, मातृसेवासंघ जवळ येथे एक, सतरंजीपुरा झोन अंतगर्त येणाऱ्या मनोज हॉटेल, नाईक तलावाजवळ एक, हनुमानघाट जवळ एक, नाईक तलाव गार्डन गेटजवळ एक, लकडगंज झोन अंतगर्त येणाऱ्या नागपूरे हायस्कुल, भरतवाडा येथे एक, गुलमोहर नगर हनुमान मंदिरजवळ येथे एक अशा ठिकाणी कृत्रिम टँक व निर्माल्य कुंडीची व्यवस्था करण्यात आली आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी धोरणात्मक गुंतवणूक संवादाच्या माध्यमातून भारत-सिंगापूर आर्थिक सहकार्याच्या विस्ताराबाबत केली चर्चा

Tue Aug 27 , 2024
नवी दिल्‍ली :- केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी आज सिंगापूरमध्ये टेमासेक होल्डिंग्ज, डीबीएस बँक, ओएमईआरएस, केप्पल इन्फ्रास्ट्रक्चर आणि टीव्हीएस मोटर कंपनी यांसारख्या सिंगापूरमधील व्यापार जगतातील आघाडीच्या कंपन्यांसोबत द्विपक्षीय व्यापार आणि गुंतवणूकीच्या मुद्द्यांवर चर्चा केली. सिंगापूर येथे 26 ऑगस्ट 2024 रोजी होणाऱ्या दुसऱ्या भारत सिंगापूर मंत्रीस्तरीय गोलमेज बैठकीत सहभागी होण्यासाठी गोयल आज (25 ऑगस्ट 2024 रोजी) सिंगापूर येथे […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com