महाराष्ट्राच्या विकासासाठी वाटेतील काट्यांशी लढत आम्ही पुढे जाऊ – जयंत पाटील

विरोधात बोलणाऱ्याला अटक कशी होईल हाच मनसुबा सत्ताधाऱ्यांचा…

मुंबई : – मुद्दे नसले की गुद्द्यांवर येऊन प्रत्येकवेळी नवा विषय उकरून काढत विरोधात बोलणाऱ्याला अटक कशी होईल हाच मनसुबा सत्ताधाऱ्यांचा आहे. मात्र सर्वांगीण महाराष्ट्राच्या विकासासाठी वाटेतील काट्यांशी लढत आम्ही पुढे जाऊ कारण महाराष्ट्रातील जनतेचा आशीर्वाद आणि विश्वास आमच्या पाठीशी आहे असा आत्मविश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी ट्विटमध्ये व्यक्त केला आहे.

सत्तेचा सदुपयोग करून सर्वसामान्य जनतेचे हित साधण्याऐवजी सत्तेला हुकूमशाहीचे अस्त्र मानून त्याचा दुरुपयोग विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी, त्यांची सर्व बाजूने कोंडी करण्यासाठी केला जातोय असा थेट आरोप जयंत पाटील यांनी केला आहे.

साम-दाम-दंड-भेद या सर्वांचा वापर करून सत्ताधारी स्वतःचा राजकीय स्वार्थ साधण्यात व्यस्त आहेत. मात्र राज्यातील जनतेचा अकार्यक्षम सरकारविरोधातील आक्रोश वाढला की स्वतःचे अपयश झाकण्यासाठी आणि विरोधकांनी आवाज उठवला की त्यांचे तोंड बंद करण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणा, राज्यातील पोलीस यंत्रणा यांचा वापर करून दडपशाही सुरु आहे असेही जयंत पाटील यांनी म्हटले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

बसपा ने लहुजी साळवे ह्यांना अभिवादन केले

Tue Nov 15 , 2022
नागपूर :-फुले दाम्पत्यांचे अंगरक्षक आद्य क्रांतिकारक लहुजी उस्ताद साळवे यांच्या 228 व्या जयंती निमित्ताने बहुजन समाज पार्टी नागपूर जिल्ह्याच्या वतीने लहुजी साळवे उद्यान (अंबाझरी गार्डन) नागपूर येथे त्यांना जिल्हाध्यक्ष संदीप मेश्राम, जिल्हा प्रभारी राहुल सोनटक्के, प्रदेश मीडिया प्रभारी उत्तम शेवडे ह्यांच्या नेतृत्वात माल्यार्पण करुन, स्फूर्ती दायक घोषणा देऊन अभिवादन केले. लहुजी वस्ताद ह्यांनी इंग्रजी राजवटी च्या विरोधात संघर्ष केला, पुढे […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com