संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
-सामान्य ज्ञान स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
कामठी :- भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंती निमित्त प्रबुद्ध सांस्कृतिक संघ व वाचनालय न्यु खलाशी लाईन कामठीच्या वतीने काल 9 एप्रिलाला न्यू खलाशी लाईन स्थित अविनाश हायस्कुल येथे परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर व इतर थोर महापुरुषांच्या जीवनपटावर एक दिवसीय सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षा आयोजित करण्यात आले होते. या परीक्षेत वय 8 ते त्यापेक्षा जास्त वयाच्या स्पर्धकांनी परीक्षेत सहभाग घेतला.परीक्षेला उत्स्फूर्त प्रतिसाद प्राप्त झाला असून परीक्षा यशस्वीरीत्या पार पडली.
या सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षेत शहर व शहराबाहेरील असे 150 च्या जवळपास विद्यार्थी सहभागी झाले होते.परीक्षा सुरळीत पार पडली असून परीक्षेचा निकाल 13 एप्रिलला जाहीर करण्यात येणार असून 13 एप्रिल ला सायंकाळी 6 वाजता बक्षिस वितरण होणार आहे.
या परीक्षेच्या आयोजनासाठी ऍड डी सी चहांदे, मिलिंद चवरे, प्रबुद्ध सांस्कृतिक संघ व वाचनालयाचे बंटी रामटेके,आशिष गेडाम,रोहित थुले, मोहित लोणारे,विशाल रंगारी,विश्वदीप राऊत,सिद्धांत गेडाम,रोशन देशभ्रतार,प्रवीण लांजेवार,सनी मेश्राम,निशांत मिश्रा,चेतन देशभ्रतार, राहुल मेश्राम,श्रेयश थुले,रोहित रंगारी ,हनी थुले, अभिजित रोडगे, रंजित सहारे यासह समस्त सदस्यांनी मोलाचे परिश्रम घेतले.