स्नेक बाईट पेशंट 72 तासापासून बेशुद्ध

नागपूर :- अविनाश रंगारी कॉलेजचा विद्यार्थी (वय 18) राहणार हुडपा तहसील कुही, जिल्हा नागपूर ह्याला 25 नोव्हेंबर ला सकाळी 11.30 च्या सुमारास शेतात गेला अस्तांना चवऱ्या मायडूर ह्या विष्यारी सापाने 2 वेळा चावा घेतला. त्याला नागपूर मेडिकल येथे वार्ड नंबर 52 आयसीयू मध्ये त्याच दिवशी दुपारी 1 वाजता ऍडमिट केले आहे. त्याला 72 घंटे होऊन अजून पर्यंत प्रॉपर आराम झालेला नाही तो अजूनही बेशुद्ध आहे. पेशंट जवळ त्याचे नातेवाईक करण देशपांडे – आहेत. महामहीम राष्ट्रपती या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मेडिकल (दवाखाना) ला दोन दिवसानंतर भेट देत आहेत, व त्याच ठिकाणी मागील 72 तासापासून अविनाश उपचाराविना पडून आहे, अविनाश वर विना विलंब योग्य उपचार करून एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्याला जीवदान व न्याय द्यावा असे आवाहन बसपाचे महाराष्ट्र प्रदेश मीडिया प्रभारी उत्तम शेवडे यांनी केले आहे.

NewsToday24x7

Next Post

प्रधानमंत्री पिक विमा योजने अंतर्गत शेतकऱ्यांनी पिक नुकसानीच्या पुर्व सूचना नोंदवाव्या

Wed Nov 29 , 2023
भंडारा :- प्रधानमंत्री पिक विमा योजने अंतर्गत खरीप हंगाम 2023-24 मध्ये सहभागी झालेल्या शेतकऱ्यांना काढणी पश्चात अवस्थेत धानाचे पिक कापणी करून सुकवणी साठी शेतात पसरवून ठेवले असता गारपीट, चक्रीवादळ, चक्रीवादळामुळे आलेला पाऊस आणि बिगरमोसमी/ अवकाळी पाऊसामुळे नुकसान झाले असल्यास वैयक्तिक स्तरावर पंचनामे करून नुकसान मिळण्याची तरतूद आहे. Your browser does not support HTML5 video. सद्यस्थितीत बिगरमोसमी/ अवकाळी पाऊस सुरू असल्यामुळे […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com