तिरंदाजी – कंपाऊंड प्रकारात तीन पदके, पार्थ कोरडेला वैयक्तिक कांस्य आणि सांघिक रौप्यपदक

फोंडा :-महाराष्ट्राच्या तिरंदाजांनी रविवारी कंपाऊंड प्रकारात एक रौप्य आणि दोन कांस्य अशी एकूण तीन पदकांची कमाई केली. यात पार्थ कोरडेचे वैयक्तिक कांस्य आणि सांघिक रौप्य अशी दोन पदके मिळवली. एक कांस्य महिला संघाने पटकावले.

सांघिक पुरुष प्रकारात पार्थ, मानव जाधव, प्रथमेश जावकर आणि हर्ष बोराटे यांचा समावेश असलेल्या महाराष्ट्राच्या संघाने २२४ गुणांसह दुसरा क्रमांक मिळवला. दिल्लीने २२८ गुण मिळवून सुवर्ण आणि राजस्थानने २३१ गुण मिळवून कांस्यपदक मिळवले.

पार्थने वैयक्तिक प्रकारात १४३ गुण मिळवून तिसरा क्रमांक मिळवला. दिल्लीच्या ऋतिक चहलने (१४९ गुण) सुवर्ण आणि राजस्थानच्या रजत चौहानने (१४५ गुण) कांस्यपदक मिळवले.

महिला सांघिक प्रकारात महाराष्ट्राने २२६ गुण मिळवून तिसरा क्रमांक मिळवला. महाराष्ट्राच्या संघात पूर्वशा शेंडे, तेजल साळवे, मामंगावकर, पृथिका सीमॉन यांचा समावेश होता. राजस्थानने २२८ गुण मिळवून सुवर्ण आणि पंजाबने २२६ गुण मिळवून कांस्यपदक मिळवले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

भाजपा की जुमलेबाज़ी में न फंसने की अपील की किसान सभा ने, पूछा - आदिवासियों के मुद्दों पर चुप क्यों है भाजपा?

Mon Nov 6 , 2023
रायपुर :- अखिल भारतीय किसान सभा से संबद्ध छत्तीसगढ़ किसान सभा ने भाजपा के घोषणापत्र ‘मोदी की गारंटी’ को “जुमलाबाजी” करार देते हुए आम जनता से इसमें न फंसने और पूरे प्रदेश में भाजपा की हार सुनिश्चित करते हुए एक धर्मनिरपेक्ष सरकार के गठन के लिए मतदान करने की अपील की है। किसान सभा ने कहा है कि स्वामीनाथन आयोग […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com