– कसून सरावानंतर किताबासाठी सज्ज
पणजी :-विश्वचषक विजेता युवा तिरंदाज प्रथमेश जावकरसह आंतरराष्ट्रीय तिरंदाज शर्वरी शिंदे, मंजिरी यांना राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदकाचे प्रबळ दावेदार मानले जात आहे. सोमवारपासून तिरंदाजीच्या पात्रता फेरीला सुरुवात होणार आहे.
महाराष्ट्राच्या तिरंदाजांची यंदाच्या हंगामामधील आंतरराष्ट्रीय स्तरावरील कामगिरी त्यांच्या पदकाच्या आशा उंचावतात. महाराष्ट्राचे तिरंदाज मुख्य प्रशिक्षक अमर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली कसून सराव करत आहेत.