संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- कामठी तालुक्यांतर्गत येणाऱ्या ग्रामीण भागात ले आऊट चे मोठ्या प्रमानात जाळे पसरले असून कित्येक ले आउट हे नियमबाह्य पद्धतीने असून प्रशासनाच्या अभयपणामुळे बेभान असे प्लॉट विक्री करून प्लॉट विक्रीचा गोरखधंदा सुरू आहे आणि या गोरखधंद्याला स्थानिक प्रशासन पाठराखण करीत आहे.असाच एक प्रकार कामठी तालुक्यातील घोरपड ग्रा प हद्दीतील नजीब कॉलोनी येथील खसरा नं 223/3 आणि 247/2मधील ले आऊट नियमबाह्य पद्धतीने मंजूर करण्यात आला असून ग्रा प च्या दोन माजी महिला सरपंचाची खोटी स्वाक्षरी घेऊन त्यांच्या कार्यकाळाआधीच सही घेऊन ले आऊट नकाशाला मंजुरी दिली आहे तसेच या ले आऊट मधील लोकांच्या उपयोगासठी आरक्षित असलेली ओपन स्पेच्या जागेवर प्लॉट आकारणी करीत आहे.यासंदर्भात हे प्रकरण महसूल प्रशासनासह पोलीस दरबारी मांडण्यात आला असून गेल्या काही दिवसापासून फक्त कागदोपत्री चाचणी सुरू आहे तेव्हा या दोषींवर कारवाही केव्हा होणार?असा सवाल येथील जागरूक नागरिक करीत आहेत.
घोरपड ग्रा प हद्दीत येणाऱ्या प ह नं 18 ,खसरा नं 223/3आणि 247 /2मधील ले आउट मध्ये नजीब कॉलोनी वसाहत वास्तव्यास आहे.नियमानुसार ले आउटमध्ये लोकोपयोगी मोकळी जागा आरक्षित करणे गरजेचे असते त्यानुसार नकाशाला मंजुरी दिली जाते त्यानुसार घोरपड ग्रा प हद्दीत आशीर्वाद गृह निर्माण सहकारी संस्था कामठी ने घोरपड ग्रा प च्या 1 मे 2000 च्या मासिक सभेत खसरा नं 222/3 च्या जागेतील ले आउटला माजी महिला सरपंच प्रमिला मेश्राम व सचिव विद्या मुळे यांनी मंजुरी दिल्याचा नकाशा मंजूर केला ज्यामध्ये ओपन स्पेस दर्शविण्यात आले.
वास्तविकता घोरपड शिरपूर गट ग्रा प चे तत्कालीन सरपंच म्हणून सन 2000 ते 2005 या पंचवार्षिक कालावधीत सावित्री सत्यवान मेश्राम होत्या तसेच सचिव ए जी तांदुळकर होते मग सण 2000 मध्ये आशीर्वाद गृह निर्माण सहकारी संस्थेने सन 2000 मध्ये मंजूर केलेल्या नकाशासाठी झालेंल्या ग्रा प च्या मासिक सभेतील मंजूर नकाशावर 2010 ते 2015 या पंचवार्षिक कालावधीत असलेल्या तत्कालीन सरपंच प्रमिला मेश्राम तसेच 2005 ते 2016 या कालावधीत सचिव असलेल्या तत्कालीन सचिव विद्या मुळे यांच्या स्वाक्षरी कश्या?असा प्रश्न उपस्थित झाल्यानंतर सदर प्रकरणाशी संबंधित कागदपत्र माहिती अधिकारात मागितलेल्या माहिती पत्रकात स्पष्ट नमूद आहे त्यावरून माजी सरपंचाची खोटी स्वाक्षरी होऊन बनावट स्वाक्षरीच्या आधारे नकाशा मंजुरीसाठी मासिक सभेची मंजुरी असल्याचे निदर्शनास आणून फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस येताच याबाबत स्पष्टीकरण देत आमच्या स्वाक्षरीचा गैरवापर केल्याचा निदर्शनास येताच दोन्ही माजी सरपंच प्रमिला मेश्राम तसेच सावित्री मेश्राम यांनी स्थानिक पोलीस स्टेशनला तक्रार नोंदवून फसवणूक करणाऱ्या ले आउट धारकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली मात्र पोलीस प्रशासनाला संबंधित ले आउट धारकाकडून मिळत असलेल्या चिरीमिरी मुळे सदर प्रकरण थंडबसत्यात ठेवून ले आउट धारकाची पाठराखण करीत आहे तर ले आउट धारक ले आउट मधील राखीव जागेवरही प्लॉट पाडून विकण्याच्या बेतात आहे तेव्हा या प्रकाराला लगाम लागून दोषींवर कारवाही व्हावी अशी मागणी जोर धरत आहे.