– स्वच्छ भारत अभियान : शोध पथकाची कारवाई
नागपूर :- स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने बुधवार (ता.७) रोजी १५ प्रतिष्ठानांवर कारवाई करून २ लाख ५ हजार रुपयांचा दंड वसूल केला. यात सिव्हर लाइन ब्लॉक केल्या प्रकरणी दोन रेस्टोरेंटवर कारवाई करून प्रत्येकी ५० हजाराचा दंड वसूल करण्यात आला.
मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांच्या मार्गदर्शनात लक्ष्मीनगर झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे रामदासपेठ येथील मेडीट्रीना हॉस्पिटल यांच्यावर ओला व सुखा कचऱ्याचे व्यवस्थापन योग्यरीत्या न केल्याप्रकरणी कारवाई करीत १० हजार रुपयांचा दंड वसूल केला. तर आरपीटीएस रोड येथील माटे चौक जवळच्या मोटघरे हार्डवेअर यांच्यावर रस्त्यालगत बांधकाम साहित्य पसरविल्याबद्दल कारवाई करीत १० हजार रुपयांचा दंड वसूल केला. तसेच धरमपेठ झोन अंतर्गत सिव्हिल लाईन येथील ननकिंग्स रेस्टोरेंट आणि जे के. व्हेंचर्स रेस्टोरेंट यांच्यावर सिव्हर लाइन ब्लॉक करणे, आणि कचरा शुल्क न भरणे याप्रकरणी कारवाई करीत प्रत्येकी ५० हजाराचा असा एकूण १ लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे. तर धंतोली येथील व्यंकटेश हेवी स्टेटस यांच्यावर परिसरात अस्वच्छता पसरविल्या प्रकरणी कारवाई करीत ५ हजारांचा दंड वसूल केला आहे.
धंतोली झोन अंतर्गत सुयोग नगर स्थित सद्गुरू डेव्हलपर्स यांच्यावर रस्त्यालगत बांधकाम साहित्य पसरविल्याबद्दल कारवाई करीत १० हजार रुपयांचा दंड वासून केला. तर उंटखाना चौक येथील टर्निओन व्हिजन प्रा. लि. यांच्यावर कारवाई करीत ५ हजार रुपयांचा दंड वसूल केला. तर नेहरू नगर झोन अंतर्गत दिघोरी येथील शिवालय स्कीम बीएसडब्ल्यू बिल्डिंग यांच्यावर रस्त्यालगत बांधकाम साहित्य पसरविल्याबद्दल कारवाई करीत १० हजार रुपयांचा दंड वसूल केला. गांधीबाग झोन अंतर्गत गांधीबाग येथील श्रीकृष्ण प्लयवूड अँड हार्डवेअर यांच्यावर यांच्यावर प्रतिबंधात्मक प्लास्टिक बाळगल्या प्रकरणी ५ हजार रुपयाच्या दंड वसूल करण्यात आला. सतरंजीपुरा झोन अंतर्गत इतवारी येथील हिंगणकर क्लॉथ स्टोअर यांच्यावर प्रतिबंधात्मक प्लास्टिक बाळगल्या प्रकरणी ५ हजार रुपयाच्या दंड वसूल करण्यात आला. लकडगंज झोन अंतर्गत सीए रोड येथील आंबेडकर चौक स्थित डॉ. मंदन मल्टिस्पेशालिस्ट डेंटल क्लिनिक यांच्यावर सर्वसाधारण कचऱ्यात बायोवेस्ट आढळल्या प्रकरणी कारवाई करीत १० हजार रुपयांचा दंड वसूल केला.
आशीनगर झोन अंतर्गत रमाई नगर येथील राजेश भागवत यांच्यावर कारवाई करीत ५ हजार रुपयांचा दंड वसूल केला. तसेच मंगळवारी झोन अंतर्गत नारा रोड येथील पर्यानी अँड बिल्डर्स यांच्यावर रस्त्यालगत बांधकाम साहित्य पसरविल्याबद्दल १० हजार तर ड्रेनज लाईनला अडथळा आणल्याप्रकरणी १० हजार रुपयांचा दंड वसूल केला. राजनगर येथील सन सिटी इन्फ्राटेक यांच्यावर रस्त्यालगत बांधकाम साहित्य पसरविल्याबद्दल कारवाई करीत १० हजार रुपयांचा दंड वसूल केला. ही संपूर्ण कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.