– महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा; मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार वितरण
नागपूर :- महावितरणच्या नागपूर, वर्धा सह नागपूर परिमंडलातील सर्व कार्यालयात बुधवारी महाराष्ट्र दिन आणि आंतरराष्ट्रीय कामगार दिन उत्साहात साजरा झाला. महावितरणच्या काटोल मार्गावरील ‘विद्युत भवन’, कार्यालयाच्या प्रांगणात प्रादेशिक संचालक सुहास रंगारी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तर जागतिक कामगार दिनानिमित्त वर्षभरात उल्लेखनिय कामगिरी करणाऱ्या 64 उत्कृष्ट तांत्रिक कर्मचाऱ्यांना गुणवंत कामगार पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करून गौरवण्यात आले.
या कार्यक्रमाची सुरुवात महावितरणच्या बारामती परिमंडलातील मोरगाव येथे वीज ग्राहकाच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या रिंकू बनसोडे या महिला कर्मचा-याला श्रद्धांजली अर्पण करुन करण्यात आली. संपुर्ण कार्यकाळात उत्कृष्ट काम करणा-या कर्मचाऱ्यांना सन्मानचिन्ह आणि मानपत्र प्रदान करून सन्मानित करण्यात आले. प्रादेशिक संचालक सुहास रंगारी यांनी कर्मचा-यांनी सांघिक भावना आणि नियोजनबद्ध रितीने काम करुन कंपनीचे हित जोपासण्याचे आवाहन करुन तांत्रिक कर्मचारी हे महावितरणच्या प्रगतीचे शिल्पकार असल्याचे नमूद केले. यावेळी नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता दिलीप दोडके, अधीक्षक अभियंता सर्वश्री हरिश गजबे, अमित परांजपे, राजेश नाईक, कार्यकारी अभियंता हेमराज ढोके, पुरस्कारप्राप्त कर्मचाऱ्यांसह अभियंते, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी सचिन लहाने यांनी केले.
राज्य शासनाच्या विश्वकर्मा गूणवंत कामगार पुरस्काराचे विजेते मोहनदास चौरे आणि मधुकर सुरवाडे यांच्या समवेत परिमंडलातील 12 गुणवंत यंत्रचालक आणि 52 तांत्रिक कर्मचा-यांना यावेळी सन्मानचिन्ह आणि मानपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. पुरस्कार प्राप्त कर्मचा-यांमध्ये नागपूर ग्रामीण मंडल कार्यालयाचे 4 यंत्रचालक व 19 तांत्रिक कर्मचारी नागपूर शहर मंडल कार्यालयाचे 5 यंत्रचालक व 19 तांत्रिक कर्मचारी आणि वर्धा मंडल कार्यालयाचे 3 यंत्रचालक व 14 तांत्रिक कर्मचा-यांचा समावेश आहे.
पुरस्कारप्राप्त गुणवंत कर्मचारी
नागपूर शहर मंडल – ओंकार टुले, अनिल शेंडे, दिनकर भाकरे, अभय मेंडलकर, भैयाजी रेवतकर, प्रशांत आकरे, मयूर माथुरकर, ऋषिकेश पिंजरकर, विरेन्द्र इनवाते, सुनीता टेंभुर्णे, सोपान मेकरतवार, महादेव वैरागडे, अभिषेक पाटील, गौतम नितनवरे, सेवक पारवे, रमेश उमाटे, श्रीधर मोहाडीकर, अश्विन बागडे, अभय राऊत, मोहीत त्रिवेदी, नितीन नाडेकर, मंगेश झुंजुरकर, शेख युसुफ शेख आणि आनंद रासेकर
नागपूर ग्रामिण मंडल – दत्ता जाधव, प्रविण जोगी, संजय सावरकर, राहूल कवाडे, विशाल जैस्वाल, मुकेश नागदेवे, प्रल्हाद मनघटे, रवि कोकोडे, दिनेश सोनावणे, राजेश टेकाम, सरस्वती पुराम, मनोजकुमार रेवतकर, राजेश वाघमारे, चित्तरंजन गावंडे, अमोल कुमेरिया, सुनील उके, आशिष जांभूळे, रूपेश चहांदे, नरेश राठोड, संदीप भोंडे, रीता मेहुणे, विलास नवधिंगे आणि मनोज गोल्हर
वर्धा मंडल – सुभाष पाटील, रवींद्र वानखेडे, प्रमोद फरकाडे, धनंजय खवशी, विनोद गावंडे, प्रविण कोमजवार, त्र्यंबक चटारे, नितीन गाडबैल, मुन्ना थूल, राजेंद्र उगे, )विजय रआले, निशांत तिरपुडे, विवेक चावरे, मंगेश हिवरकर, स्नेहल भगत, रोशन चिदम आणि नितिन उमक