नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाद्वारे लाड समितीच्या शिफारसी अंतर्गत अनुसूचित जाती प्रवर्गातील ४२ वारसदारांना स्थायी सफाई कामगार पदावर नियुक्तीचे आदेश निर्गमित करण्यात आले आहे. तसेच ३२९ वारसदारांच्या नावावर आक्षेप व हरकती मागविण्याकरिता यादी प्रकाशित करण्यात येणार आहे.
लाड समितीच्या शिफारशी नुसार सफाई कामगारांच्या वारसदारांना नियुक्ती देण्याबाबत मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ.अभिजित चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीचे बैठकीत दि ०२ ऑगस्ट २०२४ रोजी हा निर्णय घेण्यात आला. बैठकीत समितीचे सदस्य अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल उपायुक्त प्रकाश वराडे, उपायुक्त ( घनकचरा व्यवस्थापन विभाग ) डॉ.गजेंद्र महल्ले, मुख्य लेखा परीक्षक गौरी ठाकूर, सहाय्यक आयुक्त (साप्रवि )श्याम कापसे व विधी अधिकारी प्रकाश बरडे उपस्थित होते.
नागपूर महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागमध्ये स्थायी सफाई कामगार यांच्य्या मृत्य निवृत्ती उपरांत त्यांच्या वारसदारांना नियुक्ती देण्यासंदर्भात लाड समितीच्या शिफारसीनुसार कार्यवाही करण्यात येत आहे.