मनसे रामटेक तालुका अध्यक्षपदी सेवक बेलसरे यांची नियुक्ती

रामटेक :- मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्या आदेशाने मनसे नेते अविनाश जाधव व संदीप देशपांडे यांनी नुकतीच २० व २१ जून २०२३ ला रविभवन नागपूर येथे पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठकीचे आयोजन केले होते. यात सेवक सिताराम बेलसरे यांची मनसे रामटेक तालुका अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.

सेवक बेलसरे यांच्या नियुक्तीने रामटेक तालुक्यातील आजी व माजी पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये आनंद व्यक्त केल्या जात असून रामटेक तालुक्यात मनसे पक्ष वाढीचे कार्य यापुढे जोमाने होण्याची दाट शक्यता पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी व्यक्त केलेली आहे. यावेळी उपस्थितांमध्ये मनसे शेतकरी सेनेचे जिल्हाध्यक्ष सुरेश वांदिले, माजी मनसे तालुकाध्यक्ष अनिल मुलमुले, रतन वासनिक , जिल्हाध्यक्ष शेखर दुन्डे, मनोहर भगत , मुन्ना ओझा , प्रफुल पुसदेकर , मयूर तळेगावकर , अमित बहादुले , राकेश चौरे यांचेसह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. त्यांनी सेवक बेलसरे यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

गुणवंत विद्यार्थी, खेळाडू, अधिकारी, पत्रकारांचा सत्कार सोहळा संपन्न

Thu Jul 6 , 2023
– शांती मंगल कार्यालयात सत्कार सोहळा संपन्न रामटेक :- एन एम एम बी फाउंडेशन, नमो नमो मोर्चा, बेटी बचाव बेटी पढाव, रामटेक – पारशिवनी पत्रकार संघ, संताजी तेली समाज महासभा यांच्या संयुक्त विद्यमाने शांती मंगल कार्यालय रामटेक येथे दहावी बारावी वर्गातील शालांत परीक्षेत अव्वल गुण घेत उत्तीर्ण झालेले विद्यार्थी, उत्कृष्ट खेळाडू, उत्तम कर्तव्य बजावणारे अधिकारी, शिक्षक तथा पत्रकारांचा नुकताच सत्कार करण्यात […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com