– टॉप 50 प्रशिक्षणार्थ्यांची प्रमाणपत्र परीक्षा फी माफ.
नागपूर :- महाराष्ट्र शासनाच्या अमृत या स्वायत्त संस्थेद्वारे अमृतच्या लक्षित गटातील उमेदवारांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी ” आर्थिक साक्षरता प्रशिक्षण कार्यक्रम ” ही योजना जाहीर केलेली आहे. आर्थिक साक्षरतेच्या माध्यमातून आर्थिक सक्षमीकरण करणाऱ्या या online योजनेचा (Wealth Management) अभ्यासक्रम हा ३ टप्प्यात असेल:
टप्पा १: Basic Financial Services Knowledge.(2Month)
टप्पा २ : Professional Grooming & Personality development.(1Month)
टप्पा ३ : Market Application & Employability Skills.(1Month)
अमृतच्या लक्षित गटातील १८ ते ६० वयोगटांतील उमेदवारांना या प्रशिक्षण योजनेचा लाभ घेता येईल. ‘प्रथम येईल त्यास प्राधान्य’ या तत्त्वाने प्रवेश मिळेल. प्रशिक्षणाचा कालावधी ४ महीने राहील, शिक्षणाची भाषा इंग्रजी आणि मराठी राहील. लाभार्थीचे पदवी परीक्षा उत्तीर्ण किंवा पदवी परीक्षा ( अंतिम वर्ष) शिक्षण चालू असणे अपेक्षित आहे. लाभार्थ्याना डिजिटल स्वरूपामध्ये शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देण्यात येईल.
या अभ्यासक्रमामध्ये Mutual Funds, SIP, SWP, Stock Market, Insurance इत्यादी या गुंतवणुकी संबंधित माहिती ऑनलाईन पद्धतीने शिकविले जाईल. भारतीय विविध वित्तीय संस्थांची माहिती उदा. भारतीय रिझर्व बँक (RBI), SEBI, इ. बाबतची माहिती देण्यात येईल. प्रशिक्षणा नंतर खाली नमूद केलेल्या परीक्षे करीता अर्ज करू शकतील:
-NISM-5A
-IRDAI
या certification परिक्षेच्या पूर्व तयारी साठी सराव परीक्षा घेण्यात येतील.
आर्थिक साक्षरता प्रशिक्षण कार्यक्रमातून लाभार्थ्यांची वैयक्तिक तसेच कौटुंबिक आर्थिक स्थिती सुधारणे, स्वयं रोजगारास निर्मिती व्हावी, प्रशिक्षणा मार्फत लाभार्थ्यांनी इतर गरजू समाज घटकांची आर्थिक स्थिति सुधारण्यास मदत करावी ही अपेक्षित सकारात्मक उद्दिष्टे लक्षात घेऊन योजना राबविण्यात येत आहे.
प्रशिक्षणार्थ्यांपैकी पहिल्या ५० गुणवंत विद्यार्थ्यांचे NISM-5A, IRDAI या प्रमाणपत्र परीक्षेचे परीक्षा शुल्क हे संस्थेमार्फत बक्षीस स्वरूपी परत देण्यात येईल.
इच्छुक लाभार्थ्यांनी लाभ घेण्यासाठी www.mahaamrut.org.in या अमृत संस्थेच्या वेबसाईटला भेट द्यावी. व इच्छुक उमेदवारांनी https://app.mahaamrut.org.in/amrut/choose-login या लिंक वर जाऊन अर्ज करावा व आवश्यकते सर्व कागदपत्र अपलोड करावेत.