यवतमाळ :- श्री. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात त्वचा व गुप्तरोगशास्त्र विभागामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या तीन लेझर मशीन उपलब्ध झाल्या आहे. रुग्णांनी या मशिनचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
रुग्णांना उत्तम दर्जाच्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात म्हणून वैद्यकीय महाविद्यालयात वेगवेगळ्या प्रकारच्या सुविधा निर्माण करण्यात आल्या आहे. त्यात आणखी या तीन मशिनची भर पडली आहे. त्वचा व गुप्तरोगशास्त्र विभागामध्ये प्राप्त झालेल्या या तीन लेझर मशिन अत्यंत आधुनिक स्वरूपाच्या आहेत.
महाविद्यालयाला प्राप्त या मशिनपैकी क्यू स्विचेड लेसर या मशिनने रुग्णांच्या शरीरावरचे गोंदन मिटविले जातात, सीओटू फ्रॅक्शनल लेसर या लेझर मशीनने चेहऱ्यावरील मुरूमाचे खड्डे कमी करणे शक्य होतात. डायोड लेसर या लेझर मशीनने स्त्रियांच्या चेहऱ्यावरील अनावश्यक केस कमी करणे शक्य आहे. त्यामुळे वरील प्रकारे समस्या असलेल्या रुग्णांनी या मशिनचा लाभ घ्यावा, असे आवाहन महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॅा.गिरिष जतकर यांनी केले आहे.