वारेगाव स्टार बस सेवेचा आजपासून शुभारंभ

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- कामठी तालुक्यातील बिडबिना -वारेगाव गावात जवळपास 2 हजार लोकसंख्या असून येथील शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना शैक्षणिक हेतूने कोराडी,नागपूर येथे दैनंदिन जावे लागते मात्र या गावात नियमित बस सेवेचा लाभ मिळत नसल्याने नाईलाजास्तव विद्यार्थ्यांना मिळेल त्या वाहनाने वा खाजगी वाहनाने प्रवास गाठावा लागतो दरम्यान बरेचदा वेळेवर पोहोचत नसल्याने विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागतो.तेव्हा नागपूर महानगरपालिकेची स्टार बस ही नागपूर हुन कोराडी, सुरादेवी पर्यंत येत असते. ही बस सेवा त्यापुढील 2 की मी अंतरावरील वारेगाव ,बीड बिना पर्यंत सुरू झाल्यास बीड बिना वारेगाव ग्रामवासीयांना तसेच विद्यार्थ्यांना सोयीचे होईल तेव्हा वारेगाव बिडबिना स्टार बस सेवेचा लाभ मिळावा यासाठी वारेगाव चे भाजप पदाधिकारी पिंटू मेश्राम यांच्या नेतृत्वात गावकऱ्यांच्या वतीने गावहितार्थ भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांना निवेदन देऊन मागणी करण्यात आली.ही मागणी त्वरित पूर्ण करून आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अथक प्रयत्नातून आजपासून बिडबिना वारेगाव स्टार बस सेवेचा शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी स्टार बस चे स्वागत करण्यात आले तसेच सार्वजनिक प्याऊ चे उदघाटन करण्यात आले.

याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून महादुला नगर पंचायत चे नगराध्यक्ष राजेश रंगारी, पंचायत समिती सभापती दिशा चनकापुरे, वारेगाव ग्रा प सरपंच बांगरे, ग्रा प सदस्य राजेश मेश्राम, धनंजय इंगोले, हर्षल हिंगणेकर, पिंटू मेश्राम, चंद्रभान दुधुके, शंकर गोडाळे, गुंडेराव भाकरे, संभाजी खडसे, चेतन गोडाणे, भिवाजी दांडेकर, मुकुंदा गोडाळे, भैयालाल लांडे, वसंता गुंडाळे ,सुसूपाल निकोसे, रोहिदास गोडाळे, सागर आवजे, दिलीप पाटील, स्वप्नील खडसे, राजेश मारबते, मदनसिंग चंदेल, भास्कर गोडाळे, नलिनी नाईक, लता महाजन, लक्ष्मी घरत व गावकरी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com