अपूर्व विज्ञान मेळ्याने विद्यार्थ्यांमध्ये वाढवली विज्ञानाची रुची – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

– विद्यार्थ्यांच्या नाविन्यपूर्ण प्रयोगाचे कौतुक

नागपूर :- गेल्या अडिच दशकांपासून अपूर्व विज्ञान मेळा आयोजित करून सुरेश अग्रवाल (बाबुजी) यांनी महानगरपालिकेच्या शाळांच्या विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाबद्दल रुची निर्माण केली. अतिशय मोजक्या सोयीसुविधांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाबद्दल जनजागृती करणे हे मोठे काम आहे, या शब्दांत केंद्रीय रस्ते वाहतुक व महामार्ग मंत्री ना. नितीन गडकरी यांनी आज (शनिवार) केले.

नागपूर महानगरपालिका आणि असोसिएशन फॉर सिसर्च अँड ट्रेनिंग इन बेसिक सायन्स एज्युकेशन या संस्थेच्या वतीने राष्ट्रभाषा सभा येथे अपूर्व विज्ञान मेळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यंदा मेळ्याचे २६वे वर्ष आहे. ना. नितीन गडकरी यांनी या मेळ्याला भेट देऊन विद्याथ्यांच्या नाविन्यपूर्ण प्रयोगांचे कौतुक केले.

यावेळी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध प्रयोगांची माहितही त्यांनी घेतली. यावेळी एआरटीबीएसईचे अध्यक्ष रघू ठाकूर, उपाध्यक्ष ब्रह्मानंद स्वाई, कार्याध्यक्ष राजाराम शुक्ला, सचिव सुरेश अग्रवाल, ज्येष्ठ वैज्ञानिक डी. के. पांडे, मनपाच्या उपायुक्त आंचल सूद गोयल यांची प्रमुख उपस्थिती होती.

ना.गडकरी म्हणाले, ‘सुरेश अग्रवाल यांच्याशी माझे फार जुने ऋणानुबंध आहेत. त्यांनी अतिशय निष्ठेने शालेय विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाबद्दल जनजागृती केली. गेली २६ वर्षे ते अपूर्व विज्ञान मेळ्याचे नियमीत आयोजन करीत आहेत. महानगरपालिकेच्या शाळेत शिकणाऱ्या गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची रुची निर्माण करण्याचे काम अपूर्व विज्ञान मेळ्याने केले आहे आणि आजही हे कार्य सुरू आहे. देशाचे भविष्य ज्यांच्या हाती आहे, अशा नवीन पिढीला वैज्ञानिक दृष्टिकोन देणे हे फार मोठे कार्य आहे.’ सूत्रसंचालन ज्योती मेडपीलवार यांनी केले, तर नीता गडेकर यांनी आभार मानले.

आंतरराष्ट्रीय दर्जाचे ‘सायन्स सेंटर’

बगडगंज येथील महानगरपालिकेच्या बंद पडलेल्या शाळेचा वापर आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सायन्स सेंटरसाठी व्हावा, अशा सूचना ना. गडकरी यांनी यावेळी महानगरपालिकेला दिल्या. नागपुरातील शालेय विद्यार्थ्यांना विज्ञानाची माहिती देणारे हे केंद्र सायन्स म्युझियम म्हणूनही नावारुपाला यावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. प्राथमिक व माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांना जगभरातील विज्ञानाच्या प्रयोगाची माहिती या केंद्रातून मिळेल, असेही ना. गडकरी म्हणाले.

विज्ञान मेळ्याला १० लाख रुपये

अपूर्व विज्ञान मेळ्याच्या उपक्रमाला ना. नितीन गडकरी यांनी यावेळी १० लाख रुपयांची मदत जाहीर केली. या उपक्रमाने आजवर सातत्य राखले आहे. पण पुढेही नवीन लोक तयार व्हावे आणि त्यांच्या माध्यमातून अपूर्व विज्ञान मेळ्याने पुढच्या पिढ्यांमध्ये रुची निर्माण करावी, असे आवाहनही ना.गडकरी यांनी केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

MIMUN 3.0 INAUGURATED WITH GREAT FANFARE AT DPS MIHAN

Sun Dec 3 , 2023
Nagpur :-In order to empower the next generation of leaders in real world issues aligned with the 2030 SDGs as well as develop a better understanding of the inner working of the United Nations and build skills in diplomacy, consensus and decision making Delhi Public School, MIHAN organized the Model United Nations, MIMUN 3.0, after hosting two successful editions of […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com