नागपूर जिल्ह्यात राज्य शासनाच्या दोन वर्षातील कारकीर्दीवर आधारित पथनाट्य

पारंपारिक लोककलांची जनतेला मेजवानी

नागपूर : राज्य शासनाच्या विविध योजना उपलब्धी आणि गेल्या दोन वर्षात केलेल्या कामांचा आढावा सादर करणारे पथनाट्य जिल्ह्यामध्ये विविध भागात सध्या जिल्हा माहिती कार्यालयाच्या मार्फत सुरू आहे. कोरोनाच्या सावटातून बाहेर पडत असलेल्या जनतेला पारंपारिक कलांची ही मेजवानी भावत आहे.

            गेल्या दोन वर्षापासून कोरोनाच्या सावटात असणाऱ्या ग्रामीण व शहरी भागात पारंपारिक कलागुणांना प्रोत्साहन देणाऱ्या विविध कलापथक, पथनाट्य, गण, गवळण,कव्वाली, भारूड, बतावणी अशा विविध कला व त्यातून होणारे लोकप्रबोधन याला खीळ बसली होती. राज्य शासनाच्या माहिती व जनसंपर्क विभागाने स्थानिक जिल्ह्याच्या विविध योजनांमधून हे कार्यक्रम राबविण्यासोबतच आपल्या नव्या मोहिमेत दमदार कला पथकांच्या गटामार्फत राज्य शासनाच्या दोन वर्षातील उपलब्धी संदर्भात मांडणी सुरू केली आहे.

जिल्हा माहिती कार्यालयामार्फत हे पथनाट्य ग्रामीण भागात होत आहे. शहराच्या काही भागातही पथनाट्य होत असून त्यांना उत्तम प्रतिसाद मिळत आहे. काल नागपूर रेल्वेस्थानक, तसेच इंदोरा, श्रावस्थी बौद्ध विहार, दतात्रय नगर, नंदनवन या भागात पथकाने आपल्या स्थानिक भाषेतून लोकांसमोर योजनांची मांडणी केली. याला शहरी व ग्रामीण जनता उत्स्फूर्त प्रतिसाद देत आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

दिशा फाऊंडेशन सावळी ला मिळाले क्रीडा साहित्य...

Fri Mar 11 , 2022
– संदीप कांबळे, कामठी कामठी ता प्र 11;-कामठी तालुक्यातील दिशा फाऊंडेशन सावळी ला नेहरू युवा केंद्र नागपूर(युवा कार्यक्रम व खेळ मंत्रालय भारत सरकार) व स्पर्श जनहिताय बहुउद्देशीय संस्था नागपुर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हा युवा संमेलनात विविध क्रीडा साहित्य प्रधान करून त्यांचा गौरव करण्यात आला.दिनांक ०९ मार्च २०२२ रोजी कस्तुरबा भवन,बजाज नगर नागपुर येथे ह्या युवा संमेलनाचे आयोजन करण्यात आले […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
Verified by MonsterInsights