संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- कामठी तालुक्यातील खापा पाटण ग्रामपंचायत हद्दीत येणाऱ्या खसरा क्र 60 ब ,प ह नं 01 मधील भूखंड क्रमांक 1 व 2 या भूखंडाची कर पावती व त्या भूखंडावर हॉटेल चे बांधकाम करण्याकरिता ना हरकत प्रमाणपत्र देण्याकरिता एकूण 70 हजार रुपयांची मागणी करून 35 हजार रुपयांची लाच स्वीकारताच पाळीवर असलेल्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने धाड घालून लाच स्वीकारणाऱ्या कामठी पंचायत समितीचे माजी सदस्य व खापा पाटण ग्रा प सरपंच पती मदन राजूरकर ला रंगेहात अटक करण्यात आल्याची कारवाही काल करण्यात आली.
यासंदर्भात पोलीस स्टेशन खापरखेडा येथे आरोपी खापा पाटण ग्रा प चे ग्रामसेवक दिलीप संतोषराव हेडाऊ वय 42 वर्षे रा झिंगाबाई टाकळी नागपूर ,ग्रा प सरपंच आशा मदन राजूरकर वय 49 वर्षे व सरपंच पती मदन देवराव राजूरकर वय 58 वर्षे रा खापा पाटण तालुका कामठी यांच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक करण्यात आले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तक्रारदाराचे मालकीच्या भूखंडाला कर लावून त्या भूखंडावर हॉटेल उघडण्यासाठी लागत असलेले ना हरकत प्रमाणपत्राची मागणी केली असता ग्रामसेवक व सरपंचाने तक्रारदार यांना एकूण 70 हजार रुपयांची लाचेची मागणी करून पहिला हफ्ता वीस हजार रुपये स्वीकारले व केलेल्या कामाचा मोबदला म्हणून 40 हजार रुपयाची मागणी केली तडजोडी अंती ग्रा प सरपंच पती मदन राजूरकर यांनी 35 हजार रुपये लाच स्वीकारताच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्वरित धाड घालून आरोपी सरपंच पती ला रंगेहात अटक करण्यात आले.तसेच पडताळणी अंती यातील सरपंच व ग्रामसेवकावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आले.
ही यशस्वी कार्यवाही लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नागपूर परिक्षेत्र चे पोलीस अधीक्षक राहुल माकणीकर,अप्पर पोलीस अधिक्षक सचिन कदम,अप्पर पोलीस अधिक्षक संजय पुरंदरे यांच्या मार्गदर्शनार्थ पोलीस निरीक्षक वर्षा मते,पोलीस निरीक्षक आशिष चौधरी, सुरेंद्र शिरसाट, अनिल बहिरे,कांचन गुलबासे, अमोल मेंघरे, वंदना नगराळे,चालक प्रिया नेवारे यांनी केली.