मुंबई :- भारतीय जनता पार्टी प्रदेश, बेटी बचाओ बेटी पढाओ प्रकोष्ठ च्या प्रदेश संयोजिका डॉ.शुभा फरांदे – पाध्ये यांनी प्रकोष्ठच्या प्रदेश पदाधिकाऱ्यांची घोषणा केली आहे.प्रदेश सहसंयोजक पदी विनय त्रिपाठी, नीलिमा ताटेकर, अल्पा अग्रवाल आदींची नियुक्ती करण्यात आली आहे.प्रदेश समन्वयक म्हणून शैलेश घेडीया, मृणालिनी बागल यांची नियुक्ती करण्यात आली आहे.सुशील ओगले, अंजली साळवी, पायल कबरे, डॉ. तेजस्विनी गोळे, स्वरदा कुलकर्णी, डॉ. नागोराव बोरगावकर, सविता पूरम आदींची जिल्हा प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.प्रकोष्ठच्या प्रदेश कार्यकारिणी सदस्यपदी रजनी लखोटिया, रेश्मा नवले,सुरेश पाटील, सुवर्ण जोशी, डॉ. संध्या कोठारी आदींची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती प्रकोष्ठच्या संयोजक डॉ. शुभा फरांदे – पाध्ये यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.