मुंबई :- भारतीय जनता पार्टी उद्योग आघाडीचे प्रदेश संयोजक प्रमोद वाकोडकर यांनी प्रदेश कार्यकारिणीची घोषणा केली आहे. नवीन कार्यकारिणीत १२ विभाग संयोजक,५ सहसंयोजक, ७ समन्वयक यांचा समावेश आहे.
मराठवाडा विभाग संयोजकपदी संजय कावडे, भगवान पाडळे , पूर्व विदर्भ संयोजकपदी दर्शन जोहरापुरकर, पश्चिम विदर्भ संयोजकपदी समीर बाकरे, कोकण विभाग संयोजकपदी निमेश सावे, ठाणे संयोजकपदी परेश गुजर, दिनेश आशीवाल, पश्चिम महाराष्ट्र संयोजकपदी निखील काळकुटे, श्रीमती सायली मुतालिक, उत्तर महाराष्ट्र संयोजकपदी उत्कर्ष रवंदले पाटील, भीमराज भालेराव, महिला संयोजिकापदी शेजल कदम यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
सहसंयोजकपदी गिरधारी मंत्री, अमोल सणस, इंद्रजीत राव आदींची नियुक्ती करण्यात आली आहे .महिला सहसंयोजिकापदी जया अलिमचंदानी यांची तर प्रदेश समन्वयक पदी समीर बाकरे ,मिलिंद यंबल , कैलास अहिरे आदींची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती उद्योग आघाडीचे प्रदेश संयोजक प्रमोद वाकोडकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. दिली आहे.