संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
खडी गंमत, दंडार, भारूड, भजन व किर्तन या ग्रामिण लोककलेच्या कलावंतानी दिली उत्कृष्ट सलामी .
कन्हान : – दक्षिण मध्य क्षेत्र सांकृतिक केंद्र नागपुर व विदर्भ शाहीर कला कार परिषद कन्हान यांच्या संयुक्त विद्यमाने साहित्य रत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची जयंती प्रित्यर्थ गुरूपुजा, सांस्कृतिक कार्यक्रमाने ग्रामिण लोककलेच्या लोककलावंतानी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हयाना उत्कृष्ट लोककला सादर करून दिली सलामी. पत्रकारांचा व कलावंताचा सत्कार सोहळासह हार्दीक मंगल कार्यालय कन्हान येथे अण्णा भाऊ साठे व स्व. शाहीर धर्मदास भिवगडे यांचा प्रथम पुण्यतिथी साजरी करण्यात आली.
ग्रामिण लोककलेची जोपासणा करण्याकरिता ग्रामिण लोक कलावंता ना प्रोत्साहना करण्याच्या सार्थ हेतुने दक्षिण मध्य क्षेत्र सांकृतिक केंद्र नागपुर व विदर्भ शाहीर कलाकार परिषद कन्हान व्दारे साहित्य रत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची जयंती निमित्य गुरूपुजा, सांस्कृतिक कार्यक्रमातुन ग्रामिण लोककलेच्या लोककलावंतानी खंडी गंमत, दंडार, भारूड, भजन व किर्तनाने देशभक्ती पर ” हर घर तिरंगा “, सामाजिक समाज प्रबोधन करित लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हयाना उत्कृष्ट लोककला सादर करून दिली सलामी. पत्रकारांचा व लोककलावंताचा सत्कार सोहळा आणि विदर्भ शाहीर कलाकार परिषदेचे संस्थापक अध्यक्ष स्व. शाहीर धर्मराज भिवगडे यां-च्या प्रथम पुण्यतिथी कार्यक्रमाचे हार्दीक मंगल कार्यालय कन्हान येथे जि प नागपुर अध्यक्षा रश्मी बर्वे यांचा हस्ते उद्घाटक करण्यात आले. तर प्रमुथ अतिथी माजी मंत्री, अध्यक्ष कॉग्रेस क ना. जि ग्रामिण राजेंद्र मुळक, नरेश बर्वे, चंद्रपाल चौकसे, उल्लास मनोहर, शंकर चहांदे, राजकुमार घुले, नगरपरिषद उपाध्यक्ष योगेंद्र रंगारी यांच्या प्रमुख उपस्थित करण्यात आले. प्रमुख मान्यवरांचे स्वागत करून मान्यवरांच्या हस्ते पत्रकारांचा स्मृती चिन्ह, शाल, श्रीफळाने सत्कार करून लोक कलावंताना स्मृती चिन्ह व प्रशस्ती प्रमाण पत्र देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमास बहु संख्येने शाहीर, लोक कलावंत, कलाकारांनी बहु संख्येने उपस्थित राहुन कार्यक्रमाचा लाभ घेतला. विदर्भ शाहीर कलाकार परिषदेचे कार्याध्यक्ष अंलकार टेंभुर्णे हयानी कार्यक्रमाचे शाहीरी थाटात सुत्रसंचालन करून आभार अध्यक्ष मनिष भिवगडे हयानी व्यकत केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता विदर्भ शाहीर कलाकार परिषद नागपुर जिल्हयातील शाहीर, लोक कलावंतानी अथक परिश्रम घेतले.