मुंबई पदवीधर मतदारसंघात ॲङ अनिल परब 44 हजार 784 मतांनी विजयी

– विभागीय आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी, पी.वेलरासू

नवी मुंबई :- विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर मतदार संघाच्या व्दिवार्षिक निवडणुकीची मतमोजणी आज नेरुळ येथील आगरी कोळी संस्कृती भवन येथे शांततेत पार पडली. मतमोजणीसाठी एकूण 28 टेबल ठेवण्यात आले होते. या निवडणुकीत एकूण 67 हजार 644 मतदारांनी मतदान केले होते. त्यापैकी 64 हजार 222 मते वैध ठरली तर 3 हजार 422 मते अवैध ठरली. जिंकून येण्यासाठी 32 हजार 112 इतक्या मतांचा निश्चित कोटा ठेवण्यात आला होता.

उमेदवारांना मिळालेली मते पुढीलप्रमाणे

1) ॲड.अनिल विजया दत्तात्रय परब, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना :-44 हजार 784 (विजयी)

2) किरण रवींद्र शेलार, भारतीय जनता पार्टी :- 18 हजार 772

3) योगेश बालकदास गजभिये :- 89

4) ॲड.अरुण बेंडखळे, अपक्ष :- 39

5) ॲड. उत्तमकुमार (भाईना) नकुल सजनी साहु, अपक्ष :- 11

6) मुकुंद आनंद नाडकर्णी, अपक्ष :- 464

7) रोहण रामदास सठोणे, अपक्ष :- 26

8) ॲड. हत्तरकर सिध्दार्थ (सिध्दरामेश्वर) नि, अपक्ष :- 37

पहिल्या पसंतीची 44 हजार 784 मते मिळवून जिंकून येण्यासाठी कोटा पूर्ण केलेले उमेदवार ॲङ अनिल विजया दत्तात्रय परब हे मुंबई पदवीधर मतदार संघातून निवडून आले असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त पी. वेलरासू यांनी जाहीर केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

दीक्षाभूमीवर भव्य विद्यार्थी परिषद संपन्न

Tue Jul 2 , 2024
नागपूर :- छत्रपती शाहूजी महाराज यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त “कहीं हम भूल न जायें” या अभियाना अंतर्गत नागपूर जिल्ह्यात दहा दिवसीय “शाहू मेला ऑन व्हील्स” च्या भव्य आयोजनानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर ऑडिटोरियम, दीक्षाभूमी, नागपूर वर भव्य विद्यार्थी परिषद 30 जून, 2024 रोजी सकाळी 9:30 ते सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत संपन्न झाली. या विद्यार्थी परिषदेचे अध्यक्ष ॲड. अतुल पाटील तसेच मार्गदर्शक ॲड. […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com