संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
– संबंधित अधिकाऱ्यांना त्वरित पंचनामे करून आर्थिक नुकसान भरपाई करण्याचे दिले आदेश
कामठी ता प्र 24 :- गेल्या आठ दिवसांपूर्वी कोराडी औष्णिक वीज प्रकल्पाचे म्हसाळा येथील राखमिश्रित एश डेम्प फुटल्याने खसाळा,म्हासाळा, कवठा, भिलगाव व खैरी परिसरातील अनेक शेतकऱ्यांच्या शेतात पुराचे राख मिश्रित पाणी जाऊन मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झाले व काही नागरिकांचे घरात पाणी शिरल्याने आर्थिक हानी झाली असून त्यांची भर पावसात पाहणी करून नुकसान ग्रस्त शेतकरी व नागरिकांना प्रशासनातसर्फे नुकसानभरपाई देण्यात यावी यासाठी माजी मंत्री सुनील केदार यांनी कांग्रेस पदाधिकारी सह सदर पूरग्रस्त भागाची पाहनी करून कवठा ग्रा प कार्यालयात नुकसानग्रस्त आढावा घेत प्रशासनातर्फे केलेली कारवाही , केलेले पंचनामे आदी बाबत चौकशी करुन उपस्थित प्रशासकीय अधिकाऱ्यांना त्वरित पंचनामे करून शासकीय आर्थिक मदत देण्याचे आदेश दिले . आज रविवार सकाळी आठ वाजता सुमारास माजी मंत्री व सावनेरचे आमदार सुनील केदार यांनी कोराडी विद्युत प्रकल्पाच्या म्हसाळा येथील एश ड्याम्प फुटला त्या भागाची पाहणी करून म्हसाळा टोली येथील काही घरात राख मिश्रित पाणी शिरल्याने अनेकांच्या घरातील अन्नधान्य जीवनावश्यक वस्तूचे मोठ्या प्रकारात नुकसान झाले आहेत सोबतच कवठा ,खसाळा, म्हसाळा ,खैरी, भिलगाव येथील नागरिकांचे शेतात राख मिश्रित पाणी गेल्याने शेतातील पिकांचे सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे त्या भागाची पाहणी करून कवठा ग्रामपंचायत कार्यालयात संबंधित उपविभागीय अधिकारी श्याम मदनुरकर, तहसीलदार अक्षय पोयाम, गटविकास अधिकारी अंशूजा गराटे, मंडळ अधिकारी महेश कुलदीवार, संजय अनवाने, संजय कांबळे, विद्युत प्रकल्प कोराडीचे अधिकारी यांना नुकसानग्रस्त भरपाई देण्याचे आदेश दिले .यावेळी नागपूर जिल्हा परिषद चे अध्यक्ष रश्मी बर्वे ,नागपूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माजी मंत्री राजेंद्र मुळक ,नागपूर जिल्हा परिषद चे माजी अध्यक्ष सुरेश भोयर, जिल्हा परिषद च्या गटनेत्या अवंतिका लेकुरवाळे, जिल्हा परिषद सदस्य दिनेश ढोले ,कुंदा राऊत,माजी उपाध्यक्ष काशिनाथ प्रधान,पंचायत समीती सदस्य दिशा चनकापुरे,सुमेध रंगारी,कवठा ग्रा प चे माजी सरपंच धर्मराज आहाके,अनुराग भोयर, निखिल फलके, किशोर धांडे,घनश्याम फलके,सलामत अली, सह मोठ्या संख्येने काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.