नागपूर :- आनंदयात्री समूह,विदर्भात नाट्यक्षेत्रातील होतकरू हौशी कलावंत, दिग्दर्शक, लेखक ह्यांना आपली कला, प्रदर्शित करण्यास एक व्यासपीठ मिळावे तसेच विदर्भातील नाट्यचळवळीला प्रोत्साहन मिळावे यासाठी _विदर्भस्तरीय “आनंदयात्री एकांकिका स्पर्धा” आयोजित करीत आहे. हि स्पर्धा येत्या १८ एप्रिल (मंगळवार ) रोजी , साई सभागृह , वोक्हार्ट हॉस्पिटल मागे, उत्तर अंबाझरी मार्ग येथे सकाळी ९ ते संध्याकाळी पर्यंत सादर होणार आहे. श्रीमंत मुधोजी राजे भोसले आणि वनराई संस्थेचे विश्वस्त गिरीश गांधी ह्या कार्यक्रम चे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
विदर्भ विभागातून एकूण ७ एकांकिका सादर करण्यात येणार आहे ज्यात भंडारा (पंख छाटले पतंगाचे), तुमसर (म्हाताऱ्याची व्यथा) , बुलढाणा ( नाटेवा न्नसंप आणि अनपेक्षित) , वर्धा (निशाणी डावा आंगठा ) आणि नागपूर (आणि हिटलर येतो व स्टॉप ) येथील हौशी कलावंत आपली कला सादर करणार आहेत. हि स्पर्धा विनामूल्य असून हौशी प्रेक्षकांना सुद्धा कोणतेही प्रवेश शुल्क आकारण्यात येणार नाही. कार्यक्रमाची सांगता विदर्भातील नाट्य कलावंताचा सन्मान-सत्कार करून करण्यात येईल.