अमरदिप बडगे, प्रतिनिधी
गोंदिया – जिल्ह्यातील आमगाव तालुक्यातील कटिपार गावाजवळ नवेगाव फाट्यासमोर एका अज्ञात ट्रक ने मोटारसायकला धडक दिल्याने एका वृध्द महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची दुदैवी घटना आज घडली आहे.
मृतक वृध्द महिलेचे नाव मीराबाई घनश्याम हरीणखेडे वय 65 वर्ष असुन खुर्शीपारटोला येथील रहिवासी आहे.सदर घटना अशी आहे, कोमल हरीणखेडे ही आपल्या आजीसोबत आत्याच्या उमरी मध्यप्रदेशातील गावावरून स्कूटी क्रमांक MH 35 Z 9611 या दुचाकीवरून आपल्या खुशीपार गावी परत येत असतानाच आमगाव कामठा नवेगाव फाट्याजवळ कोमल हरीणखेडे हिने स्कुटी गाडी रस्ता विचारण्यासाठी थांबवली.असता आजी मीराबाई गाडीवरून रस्ता विचारण्यासाठी उतरली असता आमगाव कडून येणाऱ्या अज्ञात ट्रक ने वृध्द मीराबाई धडक दिल्याने तिचा जागीच मृत्यू झाला तर अज्ञात ट्रक चालकाने घटनास्थळावरून पळ काढला,सदर घटनेची माहिती मिळताच आमगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रूग्णालयात पाठविण्यात आले.सदर घटना कोमल हरीणखेडे हिच्या तक्रारीवरून अपराध 246/2022 कलम 279,304 (अ) भादवी सहकलम ,135(अ) (ब)177, 184 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास आमगाव पोलिस करीत आहेत.