कर्जाला कंटाळून शेतकऱ्यांची गळफास लावून आत्महत्या सालेकसा नवेगाव गावातील घटना.

अमरदिप बडगे – प्रतिनिधी

गोंदिया :- जिल्ह्यातील सालेकसा तालुक्यातील नवेगाव येथील एका शेतकऱ्याने कर्जाला कंटाळून गळफास लावल्याची ह्रदयदायक घटना घडली आहे.

मृतक शेतकऱ्यांचे नाव प्रल्हाद लखन दमाहे वय ४५ वर्षे असुन त्याने तीन वर्षांपूर्वी को आपरेटिव्ह बँकेतून कर्ज घेतले होते. बॅंक व सावकारी कर्ज असे मिळून एक लाख कर्ज फेडायचे होते. कर्ज फेडण्यासाठी तो नेहमी चिंतेत असायचा .शेवटी त्याने आपल्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली.सदर घटनेची नोंद सालेकसा पोलिस स्टेशनला करण्यात आली आहे. अधिक तपास सालेकसा पोलिस करित आहेत.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

ओबीसी विद्यार्थी वसतीगृहाकरीता ओबीसी सघंटनानी दिले निवेदन.

Sun Sep 4 , 2022
गोंदिया : ओबीसीच्या विद्यार्थ्यांना शहरात शैक्षणिक आधार मिळावा म्हणून ७२ वसतिगृह सुरु करण्याच्या मागणीकरीता जिल्ह्यात आज ओबीसी,व्हीजेएनटी,एसबीसी समन्वय समितीच्या आवाहनावर ओबीसी संघटनांनी, मुख्यमत्री, उपमुख्यमंत्री व ओबीसी बहुजन कल्याण मंत्र्याचे नावे असलेले निवेदन तहसिलदार यांच्या मार्फेत सादर केले. गेल्या 4 वर्षापासून ओबीसी वसतीगृह सुरु करण्याची घोषणा मागच्या राज्य सरकारने केली होती. मात्र शैक्षणिक सत्र सुरु होऊनही वसतिगृहाची घोषणा कागदावरच राहिली आहे.याशिवाय […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!