– (गांगणेर) खंडाळागावात सरपंचासह दोन जणावर ॲट्रासिटी गुन्हा दाखल
– मौदा पोलीस स्टेशन हद्दीतील खंडाळा (गांगणेर) गावातील घटना
कन्हान :- नागपूर जिल्ह्यातील मौदा तालुक्यातील मौदा पोलीस स्टेशन हद्दीतील खंडाळा (गांगणेर) येथे गावातील काही समाजकंटकानी एका व्यक्तीला सार्वजनिक ठिकानी जातिवाचक शिवीगाळ करून जिवे मारण्याचे धमकी दिली. असून सरपंचासह दोन जणावर ॲट्रासिटी ॲक्टचा गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलीसांकडून मिळालेली माहिती नुसार फिर्यादी जयदेव बाबुराव वाघमारे वय 55 वर्ष रा. खंडाळा (गांगणेर) हा शनिवार दि.2 डिसेंबरला रात्री 10 वाजता आपल्या घरी होता त्यावेळी घराजवळील रोडवर सरपंचासह गावातील दोन लोकांनी जातीवाचक शिवीगाळ केली व हातात लोखंडी रॉड, काडया, व पिस्तुल दाखवून जिवे मारण्याची धमकी दिली.दुसऱ्या दिवशी रविवार दि.3 डिसेंबरला सकाळी 8 वाजता फिर्यादी च्या घरासमोर हनुमान मंदिरा जवळ असलेल्या विहिरीजवळ सरपंचासह गावातील दोन लोकांनी जातीवाचक शिवीगाळ करून जिवे मारण्याचे धमकी दिली.अशी फ्रियादी ने तक्रार दिली.
याप्रकरणी 10 डिसेंबरला रात्री 6.40 वाजता आरोपी सरपंच संकेत वसंतराव झाडे सह मनिष झाडे, सुनिल झाडे सर्व रा.खंडाळा (गांगणेर) यांच्याविरुद्ध मौदा पोलीसांनी भादवी कलम 506,294 सह अनुसूचित जाती- जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी डिवाय एसपी पुंडलिक भटकर करीत आहे.