आंबेडकरी मतदानाचे विभाजन टाळण्यासाठी राष्ट्रीय काँग्रेस पार्टीला लोकसभा निवडणुकीत समर्थन – नारायण बागडे

नागपूर :- संविधानाला खुलेआम विरोध, महागाई, खाजगीकरण, आरक्षणाचा विरोध अल्पसंख्याकांचे खच्चीकरण, देशाचे भवितव्य इत्यादी बाबींचा विचार करून आंबेडकरी रिपब्लिकम मोर्चाने संपूर्ण राज्यात राष्ट्रीय काँग्रेस पार्टीला लोकसभेच्या निवडणुकीत जाहीर पाठिंबा दिला आहे. काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांना प्रत्यक्ष भेटून पाठिंबा जाहीर करण्यात आला. आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चा ने राज्यातील १९ मतदारसंघात उमेदवार लढविण्याचे घोषित केले होते. आंबेडकरी मतदानाचे विभाजन नको म्हणून उमेदवारांची नावे मागे घेण्यात आली या निर्णयाचे स्वागत आंबेडकरी समाजाने तसेच पुरोगामी विचारांचा लोकांनी केले आरिमो ने दिलेल्या समर्थनाने संपूर्ण राज्यातील आंबेडकरी समाजात आनंदाची लाट उमटली आहे. आता आंबेडकरी मताचे विभाजन थांबणार असून काँग्रेस पक्षाचे सर्व उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडणुकीत विजयी होतील असे परिषदेत बागडे यांनी सांगीतले.

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार यांची नागपूर मुक्कामी भेट घेवून मताचे विभाजन टाळण्यासाठी आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चाने समर्थनाचा प्रस्ताव दिला आहे परंतु अद्याप त्यांच्या कडून रिपब्लिकन मोर्चाला समाविष्ट करून घेण्यासाठी सूचना आल्या नाहीत. त्यांचे पत्र येतास समर्थनाचा विचार करण्यात येणार आहे. पत्रपरिषदेत देवेंद्र बागडे, प्रा.रमेश दुपारे, सुखदेवराव मेश्राम, नामदेवराव निकोसे, के.टी.कांबळे, राजु पांजरे, प्रविण आवळे, हंसराज उरकुळे, रामभाऊ वहाणे, सचिन नगरारे, दादाराव पाटील, प्रकाश कांबळे, मनोहर इंगोले, सुभाष बढेल, वैशाली तभाणे, संगीता चंद्रीकापूरे, सुनिता चांदेकर, जुलेखा बेगम, रुबिना खान, प्रेमलता जेकब उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

शनिवारी राजुरा, पांढरकवडा येथे ना. नितीन गडकरी यांची जाहिर सभा

Fri Apr 5 , 2024
– मोठ्या संख्येत उपस्थित राहण्याचे ना.सुधीर मुनगंटीवार यांचे आवाहन चंद्रपूर :- चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदार संघाचे भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना आणि मित्रपक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार मा. श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारार्थ शनिवारी ०६ एप्रिल २०२४ रोजी राजुरा येथे सकाळी १०.०० वाजता व पांढकवडा (जि. यवतमाळ) येथे दुपारी १.०० वाजता केंद्रीय मंत्री मा. नितीन गडकरी यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आलेली आहे. […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com