पंचशील चौक परिसराच्या कायदेशीर ताब्यापासून आंबेडकरी समाज अजूनही वंचित..

संदीप कांबळे,विशेष प्रतिनिधी 

कामठो ता प्र 1 :- कामठी बस स्टँड जवळील झोपडपट्टी परिसर हा शासन व बौद्ध धर्मीय नागरिकांच्या सोबत झालेल्या सामंजस्य कराराचा प्रतिफळ असलेला पंचशील चौक परिसर आहे. या पंचशील चौकातील ‘पंचशील ध्वज ‘करारापूर्वी जयस्तंभ चौक स्थित हुतात्मा स्मारक परिसरात स्थापित होता परंतु शासनाच्या वतीने देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात शहीद हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी वास्तूच्या निर्मितीसाठी जागेचा प्रश्न उपस्थित झाल्यावर जयस्तंभ चौकातील धर्म ध्वज पंचशील झेंडा परिसर शासनाच्या नजरेस आले व शासनाने मंजूर प्रस्तावातुन या ठिकानो शहीद हुतात्मा स्मारक उभारले व शासनाने या जागेच्या मोबदल्यात बौद्ध बांधवाना कामठी बस स्टॉप च्या समोरील मोकळी जागा पंचशिलध्वज व राष्ट्रीय कार्यक्रमाच्या उत्सवा करोता दिली होती यानुसार या ठिकानो दरवर्षी महापुरुषांच्या जयंत्या व स्मूर्ती दिन तसेच राष्ट्रीय कार्यक्रमाच्या आयोजना मुळे नगर परोषदेचा गुणगौरव वाढायचा मात्र सद्यस्थितीत ही जागा काही अतिक्रमण कारीच्या ताब्यात आहे. ज्यामुळे राष्ट्रीय कार्यक्रमासाहित धार्मिक कार्यक्रमाच्या आयोजनास अडचण निर्माण होत आहेत आणि सदर बाब शासनाच्या व बौद्ध जनतेच्या कराराची पायमलली करणारी आहे यासंदर्भात कामठी नगर परिषद चे मुख्याधिकारी संदीप बोरकर ही जागा कामठी नगर परिषद च्या मालकीची असून डी पी प्लॅन मध्ये शॉपिंग कॉम्प्लेक्स साठी आरक्षित असल्याचे सांगतात.ज्यामुळे काही वर्षांपूर्वी नगर परिषद प्रशासनाने शासन व बौद्ध बांधव यांच्यातील झालेल्या कराराचे सर्रास पायामल्ली करीत असल्याने येथील आंबेडकरी समाज या या पंचशील चौक परिसराच्या ताब्यापासून वंचित आहे. तेव्हा कामठी नगर परिषद प्रशासनाने येथील आंबेडकरी समाजाला आव्हान न देता करारानुसार देण्यात आलेल्या पंचशीलचौक परिसराचे सौंदर्यीकरण करून सदर हक्काची जागा आंबेडकरी समाजाच्या ताब्यात द्यावी अशी मागणी येथील आंबेडकरी समाजबांधव करीत आहेत.

हा विषय लवकरात लवकर मार्गी न लागल्यास कामठी नगर परिषद प्रशासनाविरोधात तीव्र आंदोलन पुकारण्यात येणार असल्याचा ईशारा येथील आंबेडकरी समाजबांधवांनी केली आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

अखेर येरखेडाचे सरपंच दोषी असल्याचा ठपका..

Tue Nov 1 , 2022
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  – मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सादर केला विभागीय आयुक्तांकडे कारवाईचा अहवाल – येरखेडा ग्रामपंचायत मध्ये आर्थिक अनियमितता कामठी, ता प्र 1 : दलितवस्तीमध्ये राहणाऱ्या अनुसूचित जाती आणि नवबौध्दांचा विकास व्हावा म्हणून शासन मोठया प्रमाणात निधी देत आहे. मात्र, हा निधीचा गैरवापर करून ठरावामध्ये दलितवस्तीसाठी निधी मिळवून घ्यायचा आणि तो निधी आला की, काम न करताच काम […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com