कन्हान :- येथील माजी मंत्री राजेंद्र मुळक यांचा जनसंपर्क कार्यालयात जनता दरबारात राजेंद्र मुळक हयानी मी जनतेच्या हितासाठी सदैव जनतेसोबत असुन मला सहकार्य करणा-या सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे व नागरिकांचे आभार व्यकत केले.
सोमवार (दि.०२) डिसेंबर २०२४ ला सायंकाळी ६ वाजता कुलदिप मंगल कार्यालय कन्हान जवळील जनसंपर्क कार्यालयात माजी मंत्री राजेंद्र मुळक यांचा जनता दरबार उत्साहात संपन्न झाला. यावेळी इंटक युनियन नागपुर क्षेत्र अध्यक्ष नरेश बर्वे, न प गटनेता मनिष भिवगडे, उपाध्यक्ष योगेंद्र रंगारी, नगरसे वक राजेश यादव, खंडाळा माजी सरपंच रविंद्र केणे, माहेर महिला मंच अध्यक्षा रिता बर्वे, नगरसेविका कल्पना नितनवरे सह मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.
याप्रसंगी जनतेच्या हितासाठी सदैव जनतेसोबत असुन महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत रामटेक मत दार संघातील जनतेने दिलेल्या प्रचंड पाठिंब्या बद्दल आणि विश्वासा बद्दल त्यांनी उपस्थित जनतेचे मनःपूर्व क आभार व्यकत केले. उपस्थित पदाधिकारी, कार्यक र्त्यांनी व नागरिकांनी आपुलकीने त्यांचे पुष्पगुच्छाने स्वागत केले. राजेंद्र मुळक हयानी उपस्थित नागरि कांच्या समस्या जाणुन घेतल्या व त्यावर उपाययोजना करण्याच्या सूचना त्यांचे पदाधिकारी व कार्यालयीन कर्मचा-याना दिल्या.